Gautam Gambhir bypassed by Team India seniors: भारतीय संघ २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागला आहे आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेतून संघबांधणीला सुरूवात होईल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांना अजूनही काही बाबींवर टीकमार्क करायचे आहे. वन डे वर्ल्ड कपचा विषय येतो तेव्हा, विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या भविष्याची चर्चा होणे साहजिक आहे. त्यात भारतीय संघातील काही सीनियर्स खेळाडूंनी गौतम गंभीरला डावलून थेट BCCI चे दार ठोठावले आहे. २०२७च्या वर्ल्ड कप स्पर्धेबाबत या सीनियर्सना त्यांच्या संघातील स्थानाबाबत स्पष्टता हवी आहे आणि त्यासाठी त्यांनी थेट बीसीसीआयकडे विचारणा केली आहे.
रोहित आणि कोहली यांनी कसोटी व आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्यांच्या संघातील स्थानाबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. गौतम गंभीरचा दृष्टिकोन आणि निवड समितीच्या मागण्यांनी या दोघांच्या स्थित्यंतरात भूमिका बजावली. आयपीएलमध्ये RCB कडून खेळताना कोहलीने हे स्पष्ट केले की, तो सध्या अशा स्थितीत नाही जिथे त्याच्याकडून 'पुन्हा स्वतःला सिद्ध करण्याची' अपेक्षा केली जाऊ शकते.
Inside Story: सूर्यकुमार यादवचा 'काटा' कोणी काढला? पडद्यामागून असा 'गेम' केला; श्रेयस नव्हे, कर्णधारपदासाठी २ नावं सुचवलेली, पण...टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापन आणि काही वरिष्ठ खेळाडू यांच्यात अद्याप एकमत झालेले नाही. सध्या, हे वरिष्ठ खेळाडू त्यांच्या भविष्याबद्दल बीसीसीआयच्या प्रमुख व्यक्तींच्या थेट संपर्कात आहेत, ज्यामुळे गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर दोघेही अवघड परिस्थितीत सापडले आहेत.
"आता लक्ष वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीवर केंद्रित झाले असल्याने, गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांनी पुढाकार घेऊन ड्रेसिंग रूममध्ये आपले विचार ठामपणे मांडावेत अशी अपेक्षा आहे. ज्या वरिष्ठ खेळाडूंनी अनेक वर्षे भारताची सेवा केली आहे, त्यांच्याकडून संघाला कोणती भूमिका अपेक्षित आहे आणि पुढील १६ महिन्यांत संघबांधणीची योजना काय आहे, हे त्यांना समजावून सांगणे महत्त्वाचे आहे," असे सूत्राने सांगितल्याचे या अहवालात पुढे म्हटले आहे.
IND vs AFG: हार्दिक पांड्याच्या जागी टीम इंडियात कोणाला जागा मिळणार? मुंबईचा ऑल राऊंडर दोन वर्षानंतर संघात परतणार...विराट ३८ व रोहित ३९ वर्षांचा आहे आणि त्यामुळेच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील त्यांच्या सहभागाबाबत चर्चा होतेय.