आरएसएस मुख्यालय, स्मृती भवन उडवून देऊ! धमकीच्या मेलनंतर नागपूर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, दोन तास केली तपासणी
esakal June 10, 2026 08:45 PM

नागपूर : शहरातील महाल परिसरात असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती भवन उडवून देण्याच्या धमकीचा मेल पुणे महापालिकेत आला. या प्रकाराने शहर पोलिसांनी बुधवारी (ता.१०) सकाळी अकरा ते एक या दरम्यान दोन्ही ठिकाणी तपासणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘खलिस्तान नॅशनल पार्टी’च्या नावाने पुणे महापालिकेत महापौरांच्या कार्यालयात मंगळवारी रात्री एक धमकीचा मेल पाठविण्यात आला. सकाळी कर्मचाऱ्याने तो उघडला असता, त्यात ‘१९८४ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ब्लु स्टार’ याला आरएसएसने पाठींबा दिला. तसेच जून ते सप्टेंबर १९८४ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन वुड्रोस’ यामध्ये २० हजार शीख बांधव मारल्या गेले, त्याचा बदला म्हणून ‘आरएसएस’मुख्यालय आणि हेडगेवार स्मृती भवनला १० जून रोजी बॉम्बस्फोट घडविण्यात येईल’ असे नमूद करण्यात आले.

PMC Bomb Threat : पुणे महापौर कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, शहरात खळबळ; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

याची माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांना मिळताच, त्यांनी सकाळी ११ वाजता दोन्ही ठिकाणी बॉम्ब शोध व नाशक पथकासह संपूर्ण ताफ्याने परिसर पिंजून काढला. दोन तास शोध अभियान राबविल्यावर काहीही न सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

गांधीबाग परिसरात आढळली होती स्फोटके

काही दिवसांपूर्वी गांधीबाग परिसरातील दोसर भवन चौकात एका व्यक्तीच्या छोट्या परसबागमध्ये मोठ्या प्रमाणात माईन्समध्ये वापरण्यात येणारी स्फोटके सापडली होती. तेव्हापासून पोलिस अलर्ट मोडवर आहे. आता धमकीच्या पत्रामुळे पुन्हा एकदा पोलिस सतर्क झाले आहे.

Pune Hospital Bomb Scare: उषाकिरण रुग्णालयातील बाथरूममध्ये टायमर लावलेले स्फोटक सापडल्याने हडपसरमध्ये खळबळ, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त अनेकदा धमक्या

शहरातील ‘आरएसएस मुख्यालय’यासह विविध महत्वाच्या ठिकाणांना उडवून देण्याची यापूर्वीही अनेकदा धमकी आलेली आहे. याशिवाय माहिती कक्षालाही तसे फोन आले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.