अपघात झाला तेव्हा सिकंदर गाडीतच होता, आता तो नेमका कुठे? वस्ताद अस्लम काझी यांनी दिली महत्वाची माहिती 
एबीपी माझा वेब टीम June 11, 2026 12:13 AM

मुंबई :  महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ त्याच्या ‘थार’गाडीचा अपघात झाला. रत्नागिरी नागपूर हायवे वर विठ्ठलवाडी येथे कारने साईड डिव्हायडरला धडक दिली होती. सिकंदरचा अपघात झाला तेव्हा तो गाडीत होता का? अपघात नेमका कशामुळे झाला? सिकंदर जखमी आहे का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडलेत. याबाबत कुस्तीसम्राट म्हणून ओळखले जाणारे वस्ताद अस्लम काझी यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सिंकदर गाडीत होता. पण सिकंदरला सुदैवाने काही लागले नसल्याची माहिती अस्लम काझी यांनीी दिली आहे.

सिकंदर शेख एकदम सुखरुप : अस्लम काझी

अस्लम काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदर शेख हा कोल्हापूरकडून कुर्डूवाडी जात होता, यावेळी ही अपघाताची घटना घडली आहे. सिंकदर शेख हा गाडीमध्ये झोपला होता, गाडी डिव्हाडरला धडकल्याने बोनेटचे नुकसान झाले आहे. पण सिकंदरला सुदैवाने काही लागले नसून तो तालमीकडे गेला आहे. तो एकदम सुखरुप असल्याची माहिती अस्लम काझी यांनी दिली आहे. सुरूवातीला गाडीच्या अपघाताचे फोटो पाहून सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली होती. परंतु सिकंदरला काही झाले नसून तो व्यवस्थित असल्याची माहिती अस्लम काझी यांनी दिली आहे. सिंकदर शेखच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी कळाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी कुस्तीप्रेमींनी काळजी व्यक्त केली होती. पण सिकंदर शेखर सुखरुप असल्याची माहिती अस्लम काझी यांनी दिली आहे. सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. गेल्या वर्षी सिकंदर शेख वादात सापडला होता. त्याला पंजाबमध्ये अटक झाली होती. सिकंदरला जाणीवपूर्वक गोवले जात असल्याचा त्याच्या वडिलांनी आरोप केला. मात्र त्यानंतर सिकंदर शेख याने जोरदार कमबॅक करत अनेक मैदानं मारली

कार चालवणाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती

आज सकाळी साडेसहाच्या सुमारा रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सिकंदर शेख याच्या थार गाडीचा अपघात झाला. कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ कार अपघातग्रस्त झाली. कार चालवणाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. नियंत्रण सुटल्याने थार कार ही साईड डिव्हायडरला धडकली. मात्र गाडी वेगात असल्याने ही जोरदार धडक बसली की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात सिकंदर शेख बालंबाल बचावले. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सिकंदर शेख यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. दरम्यान, थारच्या अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती मुळतचा ते अपघातस्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.

Sikandar Shaikh News : पैलवान सिकंदर शेखच्या थार गाडीला अपघात; कवठे महांकाळमध्ये नेमकं काय घडलं?, हादरवणारे PHOTOS

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.