Tumbadchi Manjula Box Office Collection Day 4: मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry) सध्या बॉक्स ऑफिस (Tumbadchi Manjula Box Office Collection) गाजवतेय. गेल्या काही महिन्यांत आलेल्या सिनेमांनी बॉलिवूड (Bollywood News) सिनेमांना मागे टाकून धुवांधार कमाई केल्याचं पाहायला मिळालंय. आधी 'राजा शिवाजी' (Raja Shivaji), त्यानंतर 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) आणि आता 'तुंबाडची मंजुळा' (Tumbadchi Manjula) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. हे आम्ही नाहीतर, या सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगतंय. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमानं रिलीज झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत आपल्या बजेटपैकी 60 टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल केली आहे.
'तुंबाडची मंजुळा'ची चौथ्या दिवशी दमदार कमाई (Tumbadchi Manjula BO Collection)
कोइमोईच्या रिपोर्टनुसार, सिनेमानं चौथ्या दिवशी सुमारे 70 लाख रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे, पहिल्या दिवसाच्या तुलनेत ही कमाई तब्बल 29.62 टक्क्यांनी अधिक आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी 54 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमाला 391 शो मिळालेले. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन रविवारी शोची संख्या 500 पर्यंत वाढवण्यात आली. तर सोमवारी ही संख्या 600 वर पोहोचली.
4 दिवसांत जमवला 4 कोटींचा टप्पा
'तुंबाडची मंजुळा' सिनेमानं आतापर्यंत एकूण 3.95 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं असून ग्रॉस कमाई 4.66 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पहिल्या आठवड्याअखेरीस हा सिनेमा 5.5 कोटी रुपयांचा टप्पा गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांच्या अभिनयासोबतच सिनेमाच्या कथानकाला मिळालेली पसंती ही या यशामागची प्रमुख कारणं मानली जातेय.
'तुंबाडची मंजुळा'चं डे-वाइज कलेक्शन (Tumbadchi Manjula Day Wise Collection)
| पहिला दिवस | 54 लाख |
| दुसरा दिवस | 98 लाख |
| तिसरा दिवस | 1.73 कोटी |
| चौथा दिवस | 70 लाख |
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'तुंबाडची मंजुळा' सिनेमा सुमारे 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. अवघ्या चार दिवसांत सिनेमानं 3.95 कोटी रुपयांची कमाई करत तब्बल 65.83 टक्के खर्च वसूल केलाय. हॉरर-कॉमेडी प्रकारातील सिनेमाचं दिग्दर्शन विविध कोरगावकर यांनी केलंय. सिनेमात सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांच्यासह ओम भुतकर, मकरंद अनासपुरे आणि उमेश जगताप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाची कथा आणि त्यातील विनोद-रहस्याचा मिलाफ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतोय.
2026 मधील टॉप 5 मराठी सिनेमांमध्ये स्थान (Top 5 Marathi Movies Of 2026)
'राजा शिवाजी' आणि 'देऊळ बंद 2'नंतर 2026 मधील आणखी एक यशस्वी मराठी सिनेमा म्हणून 'तुंबाडची मंजुळा'कडे पाहिलं जातंय. विशेष म्हणजे, या सिनेमानं यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 मराठी सिनेमांच्या यादीतही स्थान मिळवलंय. यासाठी त्यानं 'सुपर डुपर' सिनेमाला मागे टाकलंय. 'सुपर डुपर'नं 3.44 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि तो या यादीत पाचव्या क्रमांकावर होता.
दरम्यान, 'तुंबाडची मंजुळा' सिनेमाला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि वाढती प्रेक्षकसंख्या पाहता, येत्या काही दिवसांत 'तुंबाडची मंजुळा' बक्कळ कलेक्शन करणार असल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय.
ABP Majha च्या बातम्या LIVE: