आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला शुक्रवार 12 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील पहिन्यात सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. यजमान इंग्लंड स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका असा सामना रंगणार आहे. चमारी अट्टापट्टू श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट हीच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा आहे. यजमान असल्याने इंग्लंडला घरच्या परिस्थितीचा फायदा असेल यात दुमत नाही. त्यामुळे श्रीलंकेचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पहिल्याच सामन्यापासून चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निमित्ताने इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.