आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पंढरपूर येथे आंदोलनाला बसत आहेत. अन्नत्याग आंदोलन रोहित पवार यांच्याकडून केले जातंय. रोहित पवार यांच्या या आंदोलनाला काही वेळातच सुरूवात होईल. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नाही. आमदार रोहित पवारांच्या आंदोलनाचा निरोप जिल्ह्यातील शरद पवार पक्षाच्या आमदारांना नाहीये. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात विसंवाद पुढे येतोय. आमदार उत्तम जानकर आणि आमदार अभिजीत पाटलांना आंदोलनाची कोणत्याही प्रकारची माहिती नाहीये. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पंढरपुरात आमदार रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन होतंय. सोलापूर जिल्ह्यात शरद पवार पक्षाचे चार आमदार आणि एक खासदार आहे. आमदारांना निरोप नसल्याची थेट 2 आमदारांनी कबुली देखील दिली. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नाही.
आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून आमदार रोहित पवारांना नोटीस देण्यात आली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि शिवाजी महाराज चौकातील वाहतूक व्यवस्थेचे कारण दाखवत पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली. पालिकेने इतर मोकळ्या जागेत आंदोलन करण्याचे सुचवले होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आंदोलनावरून नोटीस देण्यात आली.
ही नोटीस आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनापूर्वी पोलिसांकडून देण्यात आली. यादरम्यानच रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. रोहित पवार यांनी लिहिले की, विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय…
विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरीकेट्स लावून आमच्या मार्गात असे अडथळे आणण्याचा प्रयत्न करतंय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय… त्यामुळं अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले… pic.twitter.com/jwXJS26zCQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2026
त्यामुळे अन्नदात्यासाठीच्या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी आंदोलन थांबणार नाही. सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो, हे सरकारने लक्षात ठेवावं. उलट लढणाऱ्याचे हात धरुन आणि बोलणाऱ्याचं तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय. पण एक मात्र खरंय, की सरकारच्या दबावामुळं जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून आमच्या मार्गात अडथळे आणले जात असले तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहे, हे सरकारने विसरु नये…!