अहमदाबाद विमान क्रॅशचा पहिला स्मृतिदिन
Webdunia Marathi June 12, 2026 04:45 PM

अहमदाबाद विमान क्रॅशचा १२ जून २०२६ आज पहिला स्मृतिदिन आहे. अहमदाबाद येथील भीषण विमान अपघाताला (Air India Flight AI-171) आज एक वर्ष पूर्ण होत असून त्याचा पहिला स्मृतिदिन पाळला जात आहे. १२ जून २०२५ रोजी झालेल्या या अत्यंत दुर्दैवी अपघाताच्या आठवणींनी आज संपूर्ण देश पुन्हा एकदा हळहळला आहे.

एअर इंडियाचे (फ्लाइट AI-171) हे विमान अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी निघाले होते. टेक-ऑफ (उड्डाण) केल्यानंतर अवघ्या ३२ सेकंदांतच हे विमान मेडिकल कॉलेज'च्या हॉस्टेल आणि मेसच्या इमारतींवर कोसळले. या भीषण दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवासी आणि कर्मचारी, तसेच जमिनीवरील १९ जण अशा एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत केवळ एक प्रवासी विश्वास कुमार रमेश सुदैवाने वाचला. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश होता.

चौकशी आणि 'ब्लॅक बॉक्स'चा सस्पेन्स
अपघाताला एक वर्ष पूर्ण झाले तरी 'अ‍ॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो'चा (AAIB) अंतिम तपास अहवाल अद्याप प्रलंबित आहे. प्राथमिक अहवालानुसार, उड्डाण केल्यानंतर विमानाचे इंजिन फ्युएल कंट्रोल स्विचेस अचानक 'कटऑफ' (बंद) झाले होते, ज्यामुळे इंजिनला इंधन मिळणे बंद झाले. मात्र, हे तांत्रिक बिघाडामुळे झाले की वैमानिकांच्या चुकीमुळे, याचे गूढ अजून उकललेले नाही. वैमानिकांच्या संघटनेने (FIP) या प्रकरणी निष्पक्ष न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

ALSO READ: चंद्रपूरमध्ये खडीने भरलेला ट्रक नाल्यात कोसळला, चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू

तसेच आज १२ जून २०२६ एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामाच्या ठिकाणी दुपारी दोन मिनिटांचे मौन पाळून या अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

ALSO READ: इमारतीला भीषण आग लागून 3 जणांचा मृत्यू

Edited By- Dhanashri Naik
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.