Virat Kohli Shares Emotional Message For Kane Williamson: न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन (Kane Williamson)याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने निवृत्तीची घोषणा करताच क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला. जागतिक क्रिकेटमधील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना अनेक चाहत्यांनी व्यक्त केली.
त्याच्या निवृत्तीनंतर जवळचा मित्र विराट कोहलीने(Virat Kohli) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. विराट कोहली आणि केन विल्यमसन यांची मैत्री खूप जुनी आहे. त्यांची मैत्री २००८ च्या अंडर-१९ विश्वचषकादरम्यान झाली होती आणि आता केनच्या निवृत्तीनंतर विराटची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
काय लिहिलं विराटने आपल्या पोस्टमध्ये?विराट कोहलीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "इतक्या वर्षांमध्ये आपण प्रतिस्पर्धी होतो, पण आता खूप चांगले मित्र झालो आहोत. तुला फलंदाजी करताना पाहणे आणि तुझ्याविरुद्ध खेळणे हा एक शानदार अनुभव होता. पण त्यापेक्षाही मला आपली मैत्री आणि विचार जास्त महत्त्वाचे वाटतात. आपण जेव्हा कधी बोलतो किंवा भेटतो, तो प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास असतो. माझ्या भावा, तुला भविष्यासाठी खूप शुभेच्छा. क्रिकेटसाठी तू तुझं काम चोख केलं आहेस. आता आरामात राहा आणि आयुष्याचा आनंद घे. शाब्बास भावा, खरं आयुष्य तर आता कुठे सुरू झालंय."
२००८ पासून सुरू झालेला केन आणि विराट यांचा मैत्रीचा प्रवास २०२६ पर्यंत अखंड राहिला. मैदानात दोघे एकमेकांविरुद्ध खेळत असले, तरी मैदानाबाहेर त्यांची मैत्री नेहमीच चर्चेत राहिली. २०२० मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यादरम्यान विराट आणि केन हे बाउंड्री लाईनजवळ जमिनीवर बसून गप्पा मारताना दिसले होते. तो फोटो आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
काय म्हणाला डेव्हिड वॉर्नर?केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नरनेही इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. वॉर्नर आणि केन हे आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळले आहेत, त्यामुळे त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे.
View this post on Instagram
त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "केनो, गेल्या अनेक वर्षांत तुझ्यासोबत आणि तुझ्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य होतं. तुझे रेकॉर्ड आणि धावा तर शानदार आहेतच, पण त्यापेक्षाही तू एक माणूस म्हणून खूप मोठा आहेस. तू क्रिकेट विश्वातील सर्वात नम्र आणि चांगल्या व्यक्तींमध्ये एक आहेस. आपण एकाच संघात असू किंवा एकमेकांविरुद्ध, तुझ्यासोबत मैदानात उतरायला मला नेहमीच आवडायचं. या अप्रतिम कारकिर्दीसाठी खूप अभिनंदन, माझ्या मित्रा! तुला माझा मित्र म्हणवून घेण्यात मला अभिमान वाटतो. तुला आणि तुझ्या कुटुंबाला खूप शुभेच्छा."
Virat Kohli: गरज नसेल तर स्वतःहून बाजूला होतो! विराटचे धक्कादायक विधान, वारंवार सिद्ध करायला लावणे अयोग्यकेन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर जागतिक क्रिकेटमधील दोन मोठे खेळाडू विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही दिग्गजांच्या पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. केन विल्यमसन आता मैदानावर खेळताना दिसणार नसला, तरी विराट कोहलीने म्हटल्याप्रमाणे क्रिकेटनंतरचं त्याचं आयुष्य आणखी सुखाचं आणि आनंदाचं असो, अशीच चाहत्यांची इच्छा आहे. क्रिकेटविश्व या महान खेळाडूला नक्कीच मिस करेल.