आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंड विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. चमारी अट्टापट्टू हीच्याच्याकडे श्रीलंकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीच कौल लागला. कर्णधार चमारीने फिल्डिंगचा निर्णय घेत इंग्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या गोलंदाज यजमान इंग्लंडला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इंग्लंड वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनी व्याट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कॅप्टन), एलिस कॅप्सी, हेदर नाइट, फ्रेया केम्प, डॅनियल गिब्सन, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्से स्मिथ आणि लॉरेन बेल.
श्रीलंका वुमन्स प्लेइंग ईलेव्हन : विश्मी गुणरत्ने, चमारी अट्टापट्टू (कॅप्टन), इमेषा दुलानी, हर्षिता समरविक्रमा, हंसिमा करुणारत्ने, कविशा दिलहारी, निलाक्षीका सिल्वा, कौशानी नुथ्यांगना (विकेटकीपर), सुगंधिका कुमारी, मलकी मदारा आणि मिताली अयोध.