तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून भेसळीच्या घटनांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. यामुळे भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, मुंढे यांना धमकी मिळाल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिला आहे.
धमकीची चर्चा फेटाळली, जुनी क्लिप व्हायरलशुक्रवारी (१२ जून) पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, त्यांना कोणतीही नवीन धमकी प्राप्त झालेली नाही. “मला धमकी आली असे कोणी सांगितले? ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली क्लिप सुमारे १० वर्षांपूर्वीची आहे. ही क्लिप पुण्यातील असावी, असे त्यांचे मत आहे. “कोणीतरी मला पाठवली होती, पण मला अशी कोणतीही धमकी आलेली नाही. आता मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूया,” असे मुंढे यांनी आवाहन केले.
रुग्णालयांमध्ये औषध खरेदीचा रुग्णांचा अधिकार अबाधितरुग्णालयांमध्ये औषधे खरेदी करण्यासंबंधी स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले. कोणत्याही रुग्णालयात दाखल झालेल्या पेशंटला आवश्यक औषधे त्यांच्या स्वतःच्या फार्मसीमधूनच घेणे बंधनकारक नाही. रुग्णांना बाहेरून कोणत्याही फार्मसीतून औषधे आणण्याचा पूर्ण अधिकार आहे. रुग्णालय प्रशासनाने पेशंटला आपल्याच फार्मसीतून औषधे घेण्यास भाग पाडणे चुकीचे असल्याचे मुंढे यांनी अधोरेखित केले. या संदर्भात प्रशासनाने योग्य आदेश काढले असल्याची माहिती त्यांनी दिली.
Tukaram Mundhe अॅक्शन मोडवर... पतंजली संबंधित औषधांचा साठा जप्त, आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही, राज्यातील सात जिल्ह्यात धडाका! अन्न सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारीअन्न सुरक्षा सुनिश्चित करण्याची जबाबदारी केवळ अधिकारी किंवा पोलिसांवरच नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. खाणारा व्यक्ती, विक्रेता आणि अंमलबजावणी न करणारा अधिकारी यांच्याही जबाबदारीचे ते सारखेच महत्त्व आहे. “जो कोणी जबाबदारी टाळेल, त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल,” असे त्यांनी बजावले. भेसळ युक्त अन्न आणि औषधांमुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, याकडे लक्ष वेधून त्यांनी सर्व घटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
गुटखा-तंबाखूजन्य पदार्थांवर मोठी कारवाईगुटखा, तंबाखूजन्य पदार्थ उत्पादन, विक्री आणि वाहतूक करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांवर अन्न आणि औषध प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. अशा सर्व घटकांना ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून, सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. भेसळीविरुद्धची ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे मुंढे यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला.
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय! गुन्हेगारांवर लागणार मकोका; प्रतिबंधित पदार्थांची पाळंमुळं नष्ट करण्याचा निर्धार