Solapur: भाळवणीत जुगार अड्यावर धाड,3 लाख 63 हजाराचा ऐवज हस्तगत
esakal June 15, 2026 01:45 PM

हुकूम मुलाणी

मंगळवेढा: तालुक्यातील भाळवणी येथील कट्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ७ जणांना ताब्यात घेत दुचाकी,मोबाईल,रोख रकमेसह 3 लाख 63 हजार 680 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असून,

पोलीस अंमलदार सिद्धनाथ अर्जुन शिंदे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांच्या ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर भाळवणी येथील ग्रामपंचायत हद्दीत काही लोक रम्मी नावाचा जुगार पैशांची पैज लावून खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. ​

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बोराळे दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. नवले, पो.ना. दुधाळ, चालक दोन पंचांसह सरकारी वाहनातून तात्काळ घटनास्थळी धाड टाकली यादरम्यान दत्तात्रय बिले (रा. खोमनाळ, मनोहर घुले, संभाजी चव्हाण, सोमनाथ दोडके, चनबसु स्वामी, दामाजी साखरे, गणपत माने सर्व जण रा. भाळवणी, ता. मंगळवेढा यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला.पो.हे.कॉ. नवले पुढील तपास करत आहेत.

Pune Ring Road: पुणे परिसरातील ११७ गावांसाठी मोठी बातमी! सरकारच्या निर्णयामुळे विकासाचा मार्ग मोकळा, रिंगरोडलाही मिळणार वेग

घटनास्थळी वडाचे व लिंबाचे मोठे झाड भर चौकात असल्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक कडक उन्हामुळे या झाडाच्या सावलीच्या आडोशाला आपल्या दुचाकी लावून ठेवलेल्या असतात मात्र पोलीस कारवाईत दुचाकी जुगार खेळणाऱ्या बरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या देखील दुचाकी ताब्यात घेतल्या पोलिसांच्या जुगार अड्ड्यावरील कारवाईचे कौतुक होत असले तरी सर्वसामान्यांच्या दुचाकी नेवून त्रास दिल्याने संताप देखील व्यक्त होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.