Kasba Beed Gold Coins : शिलाहार राजवंशाची उपराजधानी असलेल्या कोल्हापूरच्या 'या' गावात पुन्हा सापडल्या सुवर्णमुद्रा! काय आहे अतिप्राचीन 'बेडा' आणि त्रिशूळाचे रहस्य?
esakal June 15, 2026 01:45 PM

कसबा बीड (कोल्हापूर) : सोन्याचा पाऊस पडणाऱ्या कसबा बीड गावात दरवर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात सोन्याचा पाऊस पडतो, अशी अख्यायिका आहे. या घटनेचा प्रत्यय आला (Kasba Beed gold coin discovery) आहे. येथे दोन सुवर्णमुद्रा (बेडा) सापडले आहेत. येथील राजश्री गजानन मगदूम व बाळासाहेब शंकरराव वरूटे या दोघांना सोन्याच्या मुद्रा सापडल्या आहेत.

या सुवर्णमुद्रांना स्थानिक भाषेत ‘बेडा’ असे संबोधले जाते. येथील तुळशी नदी घाट परिसरातील रवींद्र पाटील यांच्या शेतात राजश्री भांगलण करताना त्यांना बेडा सापडला. या बेड्यावर त्रिशुळाचे अंकण असून, बेड्याचा व्यास सात मिमी तर वजन ०.७६ ग्रॅम आहे. या वर्षातील ही तिसरी घटना आहे.

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा वाद मिटणार? माजी मंत्र्यांनी सुचवला 'हा' 45 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक तोडगा, नागनाथअण्णांनी असं काय केलं होतं?

येथील ग्रामस्थ बाळासाहेब वरूटे यांना असाच एक बेडा सापडला आहे. खळे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील पाणंद रस्त्यावर जनावरे चारत असताना त्यांना हा बेडा सापडला. या बेड्यावर फुलाचे अंकण असून, सदर बेड्याचा व्यास सात मिमी तर वजन ०.७८ ग्रॅम आहे.

Koyna Dam Water Level : महाराष्ट्रावर 1972 पेक्षाही भयंकर दुष्काळाचे सावट? सर्वात मोठ्या कोयना धरणात उरला फक्त 15 दिवस पुरेल इतकाच साठा, पाहा काय आहे स्थिती

कसबा बीड हे गाव कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध आहे. हरबऱ्याच्या डाळी एवढ्या लहान आकाराचा हा ‘बेडा’ शंभर टक्के सोन्याचा असतो. एवढ्या लहानशा तुकड्यावर इतके बारीक अंकण करण्याचे कसब पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.