नीस (फ्रान्स) : ‘‘आजचा भारत केवळ जागतिक तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नाही, तर तो जगातील गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधणारा आणि मानवतेचे कल्याण करणारा देश बनला आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. फ्रान्समधील नीस शहरात आयोजित ‘भारत इनोव्हेट्स २०२६’ या परिषदेत बोलताना त्यांनी भारतीय तरुणांच्या कौशल्याचे आणि तंत्रक्रांतीचे जोरदार कौतुक केले.
Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा..नीस येथे आयोजित ‘भारत इनोव्हेट्स २०२६’ परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि फ्रान्समधील भागीदारीवरही भाष्य केले. या वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेल्या ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्षा’चा हा मंच एक पुढचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले, ‘‘भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच एकत्र पुढे गेले आहेत. आपण फ्रान्सच्या सोबतीने ‘भारत इनोव्हेट्स’चीही सुरुवात करत आहोत. याप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल मी माझे मित्र अध्यक्ष मॅक्रॉन यांचे मनापासून आभार मानतो.’’ या परिषदेतील तरुण उद्योजकांच्या उत्साही सहभागाची दखल घेऊन पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. सामाजिक कल्याण आणि विकासासाठी तरुण पिढी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करत आहे, त्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.
पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘आज येथे मोठ्या संख्येने तरुण उद्योजक एकत्र आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत तुम्हाला आत्मविश्वासाने भरलेल्या आणि ऊर्जादायी भारताची झलक पाहायला मिळते. नवा भारत केवळ समस्यांवर उपाय शोधणारा ग्राहक नसून, उपाय देणारा आणि स्वतः योगदान देणारा आहे. येथे काही जण ‘एआय’च्या माध्यमातून ग्रामीण भारताचे जीवन बदलण्यासाठी काम करीत आहेत, तर काही जण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. भारत शाश्वत विकासासाठी आणि संपूर्ण जगासाठी नवनवीन प्रयोग करीत आहे.’’
Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही भारत नवसंशोधनाचा देश : मॅक्रॉन‘‘भारत हा नवसंशोधनाचा देश असून, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान बदल यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये भागीदारी आहे,’’ असे अफ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी रविवारी सांगितले. ‘भारत इनोव्हेट्स’ कार्यक्रमात मॅक्रॉन बोलत होते. मॅक्रॉन म्हणाले की, आम्ही ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचा आदर करतो. फ्रान्स विविध क्षेत्रांत या उपक्रमाचा भाग राहिला आहे. भारत हा नवसंशोधनाचा देश असून, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान बदल यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत भारत आणि फ्रान्समध्ये भागीदारी वाढत आहे.