Rashmika Mandanna And Vijay Deverakonda Scholarship: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हे जोडपं लग्न झाल्यापासून चर्चेत आहेत. त्यांचा रॉयल पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. लग्नाचे फोटोही सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. लग्नाच्या दरम्यान, या कपलनं शाळकरी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार असल्याचं वचन दिलं होतं. त्यांनी हे वचन पूर्ण केलं आहे. या कपलनं तेलंगणातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली असून, त्यांनी याची यादी सोशल मीडियात शेअर केली आहे. सध्या नेटकरी आणि चाहत्यांकडून विजय आणि रश्मिकाचं विशेष कौतुक होत आहे.
विजय देवरकोंडाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानं पोस्टवर लिहिलं की, 'आम्ही थुम्मनपेट गावाकडे जात आहोत. हे एक छोटेसे गाव आहे, जिथे माझ्या वडिलांचा जन्म झाला होता. फेब्रुवारीमध्ये रश्मिकाने मी आणि आमच्या छोट्याशा स्वप्नाची घोषणा केली होती. तेलंगणातील अचमपेट मंडळातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे हे आमचे ध्येय आहे. त्यांनी कठोर आणि निष्ठेने अभ्यास केला आहे. ही त्या 180 विद्यार्थ्यांची यादी आहे, ज्यांनी आपल्या मेहनतीने पालकांची मान अभिमानाने उंचावली आहे', या यादीसोबतच विजयने स्वत: चा आणि रश्मिकाचा एक फोटोही शेअर केला आहे.
We are on our way to Thummanpet.
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) June 14, 2026
The little village where my Father was born.
In February - @iamRashmika and I had announced the beginning of a little dream of ours.
To reward all the hardworking students of 9th and 10th grade from Achampet Mandal of Telangana.
Here is a… pic.twitter.com/wLNSr4ZZHe
विजय देवरकोंडाच्या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी या कपलचे विशेष कौतुक केले आहे. दरम्यान, नुकताच या कार्यक्रमाचा व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओत रश्मिका मुलांना प्रोत्साहन करताना दिसत आहे. अभिनेत्री म्हणाली, 'आयुष्यात कधी आपण जिंकतो, तर कधी आपण हरतो. पण प्रत्येकवेळी आपण काही न काही शिकतो'.
'तुम्ही तुमच्या आई- वडिलांकडून आणि शिक्षकांकडून शिकत राहा. मोठे यश मिळवण्यासाठी आयुष्यात पुढे जात राहा', असं रश्मिका मंदाना, शिष्यवृत्ती आणि सत्कार समारंभात म्हणाली. विजय आणि रश्मिका यांनी त्यांच्या लग्नानंतर सत्यानारायणची पूजा ठेवली होती. यानंतर ते थुम्मनपेट गावी गेले होते. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणात मदत करण्याची शपथ घेतली होती. सध्या या कपलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'देऊळ बंद 2' सिनेमाचा नाद करायचा नाय; चौथ्या आठवड्यातही जबरदस्त कमाई, रविवारचं कलेक्शन किती?