Sanchita Ugale news: टीव्ही इंडस्ट्रीला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. अभिनेत्री संचिता उगले (Sanchita Ugale) या तरुणीनं आत्महत्या केली आहे. वयाच्या 30 व्या वर्षी (Actress) तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनानंतर सिनेइंडस्ट्रीला (Entertainment) मोठा धक्का बसला आहे. टेलीचक्करच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीनं राहत्या घरी गळाला दोर लावू आयुष्य संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी 6:30 ते 7:30 च्या दरम्यान, घडल्याची माहिती आहे. अभिनेत्रीने नेमकी आत्महत्या का केली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तिच्या कुटुंबाने कोणतीही माहिती दिलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री आपल्या आई- वडील आणि बहिणीसोबत नालासोपारा येथे राहत होती. घटना घडली तेव्हा अभिनेत्री एकटीच होती. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री टेलिव्हिजन आणि सिनेमातून ओळख निर्माण करत होती. तिला खरी ओळख झी टीव्हीवरील कुमकुम भाग्य या शोमुळे मिळाली. वागले की दुनिया या मालिकेतही तिनं काम केलं. नंतर तिनं दंगल टीव्ही वाहिनीवरील, 'दिलवाली दुल्हा लै जाएगी' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका साकारली होती. तिच्या अभिनयातून तिला टीव्ही विश्वात विशेष ओळख मिळाली.
View this post on Instagram
टेलिव्हिजन जगतात काम करण्याव्यतिरिक्त, अभिनेत्रीनं सिनेमा आणि स्ट्रीमिंग प्रोजेक्ट्समध्ये काम केलं. विशेष म्हणजे तिनं विकी कौशलच्या 'छावा' या ऐतिहासिक सिनेमात तारा राणी यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीनं मनोज बाजपेयी यांच्या 'सायलेन्स 2: द नाईट आऊल बार शूटआऊट' या सिनेमातही तिनं काम केलं. अभिनेत्री सोशल मीडियातही सक्रिय होती. संचिताचा चाहतावर्ग खूप मोठा होता. दरम्यान, अभिनेत्रीनं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'देऊळ बंद 2' सिनेमाचा नाद करायचा नाय; चौथ्या आठवड्यातही जबरदस्त कमाई, रविवारचं कलेक्शन किती?