TV Actress Sanchita Ugale Death Connection With Sushant Singh Rajput: 30 वर्षांच्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं (Marathi Actress) आपलं आयुष्य संपवलं आणि टेलिव्हिजन विश्व पुरतं हादरून गेलं. प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगले (Actress Sanchita Ugle) हिनं नालासोपाऱ्यातील (Nala Sopara) आपल्या राहत्या घरी 14 जून रोजी आत्महत्या केली. संचिताच्या आत्महत्येची बातमी इंडस्ट्रीत वाऱ्यासारखी पसरली आणि कित्येक कलाकारांच्या पायाखालची जमीन सरकली. अनेकांना संचिताच्या आत्महत्येचं बातमी ऐकून जबर धक्का बसला. संचितानं हे पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपासही करत आहेत. पण, तरीसुद्धा संचिताला गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नसल्यानं तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जातंय. तिच्या अशा जाण्यानं तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, मनोरंजन विश्वातलं वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे.
संचिता उगले (Sanchita Ugale) हिनं 'साजन घर', 'कुमकुम भाग्य' (Kumkum Bhagya), 'वागळे की दुनिया' (Wagle Ki Duniya) आणि 'दिलवाली दुल्हनिया ले जाएंगे' मालिकांमध्ये काम केलं होतं. 'कुमकुम भाग्य' हिंदी मालिकेत तिनं 'दिया टंडन' ही भूमिका साकारलेली. एक धक्कादायक योगायोग म्हणजे, 2020 मध्ये याच तारखेला सुशांत सिंह राजपूत याचंही निधन झालं होतं. संचिता उगले टेलिव्हिजन आणि सिनेमा अशा दोन्ही माध्यमांमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. तिनं विकी कौशलच्या 'छावा' सिनेमात 'ताराराणी' ही भूमिका साकारलेली.
संचिता उगलेचा शेवटचा VIDEO व्हायरल (Sanchita Ugale Last Video Viral)
सर्वांना हादरवणारी गोष्ट म्हणजे, संचिताची शेवटची पोस्ट. मृत्यूच्या 19 तासांपूर्वी अभिनेत्रीनं इन्स्टावर एक रील पोस्ट केलेलं. यामध्ये ती हसत-खेळत रिल करताना दिसतेय. हा व्हिडीओ पाहून कोणीही अंदाज बांधू शकणार नाही की, पुढच्या काही तासांतच अभिनेत्री आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकते. व्हिडीओमध्ये संचिता कॅमेरा हातात धरून दिसतेय.
संचिता उगलेच्या शेवटच्या रिलमध्ये दिसणाऱ्या चेहऱ्यामागे कोणत्या गोष्टीचं दुःख लपलेलं? याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. कॅप्शनमध्ये संचितानं लिहिलंय की, "मैं नाचूं तू नचा... 139K फॉलोअर्स होते. तिचं इन्स्टा अकाउंट पाहून समजतंय की, ती एकदम बिनधास्तपणे, आत्मविश्वासानं जगणारी मुलगी होती. तिच्या निधनाच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला आहे.
संचिता आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूच्या तारखांमध्ये कनेक्शन? (TV actress Sanchita Ugale and Sushant Singh Rajput)
संचिता उगले हिच्या आत्महत्येच्या बातमीनं अख्खं बॉलिवूड हादरलं आहे. 14 जून 2020 रोजी तिनं आत्महत्या केलीय. तिच्या निधनाला सहा वर्ष पूर्ण झालीत. दोघांच्याही मृत्यूची तारीख एकच आहे. ही बाब अनेकांना चकीत करणारी ठरली आहे. संचिताच्या जाण्यानं तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केल्यानंतरही तिनं असं टोकाचं पाऊल उचलणं, ही फारच धक्कादायक बाब आहे.
पाहा व्हिडीओ : Sanchita Ugale Died : टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री संचिता उगलेने जीवन संपवलं
ABP Majha च्या बातम्या LIVE