जगभरात विवाहाशी संबंधित अनेक अजब गजब कायदे आणि परंपरा पाहायला मिळतात. पण, एका देशात चक्क दोन लग्न करणे कायद्याने बंधनकारक आहे. जर एखाद्या पुरुषाने दोन लग्न करण्यास नकार दिला, तर त्याला थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते. ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातील एका देशात हा अजब कायदा लागू आहे.
आफ्रिकी महाद्वीपच्या इरीट्रियामध्ये प्रत्येक पुरुषाला दोन लग्न करावी लागतात. इथे प्रत्येकाने दोन लग्न करण्याचा कायदा आहे. एखादा व्यक्ती जर दुसरं लग्न करायला तयार नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे त्या व्यक्तीला आजन्म कारावास भोगण्याची शिक्षा दिली जाते.
हेही वाचा – ना भारत, ना चीन… हा आहे 1 लाखांपेक्षा जास्त नद्या असलेला देश
लिंग गुणोत्तरामुळे नियम
इरिट्रियाच्या सरकारने हा कठोर नियम लागू करण्यामागे देशातील लिंग गुणोत्तराचे असंतुलन हे प्रमुख कारण दिले आहे. इरिट्रिया अनेक वर्षांपासून शेजारील देश इथिओपियासोबत युद्धात गुंतला होता. या दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे देशातील अनेक पुरुष मारले गेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून देशात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. या विषमतेमुळे सरकारने देशाची लोकसंख्या आणि सामाजिक संतुलन राखण्यासाठी हे ‘दोन पत्नी’चे धोरण स्वीकारले. त्यातून मुलांची उत्पत्ती होईल आणि लोकसंख्या वाढेल हा त्या मागचा उद्देश आहे.
पत्नीने पतीला लग्न करण्यापासून अडवू नये
पुरुषांना दोन लग्न करण्याची परवानगी कायद्याने दिलेली असताना पत्नींसाठीही कायद्यात काही नियम आहेत. पती दुसरं लग्न करत असेल तर पहिली पत्नी त्याला रोखू शकत नाही. जर पहिल्या पत्नीने आपल्या पतीला दुसरं लग्न करायला नकार दिला तर तिच्याविरोधात कारवाई होऊन तिलाही तुरुंगात टाकलं जातं.
हेही वाचा – जमिनीच्या खालून वाहणारी नदी