दूषित पाण्यामुळे कोणते आजार होतात? पावसाळ्यात घ्या ही काळजी
Marathi June 15, 2026 08:25 PM




मुंबई आणि उपनगरात अद्याप पावसाला सुरूवात झाली नाही. परंतू काहीच दिवसात पावसाला सुरूवात होईल असं सांगण्यात येतंय. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दुषित पाण्यात पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसात आरोग्य सांभाळावे असा सल्ला डॉक्टर देतात. या दिवसांत अनेक भागांत पुराच्या पाण्यामुळे किंवा गळतीमुळे दूषित किंवा दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. असे दुषित पाणी शरीरात गेल्यास अनेक गंभीर आजार उद्भवतात. आजच्या लेखात आपण दुषित पाण्यामुळे कोणते आजार होतात, पावसाळ्यात कोणती काळजी घ्यावी याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

कॉलरा

कॉलरा दुषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. एखाद्या व्यक्तीला कॉलरा झाल्यास डिहाड्रेशन आणि डायरियाची समस्या जाणवते.

हेही वाचा – डेंग्यू, मलेरिया आणि सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी हे घरगुती काढे ठरतील वरदान

काविळ

दुषित पाण्यामुळे यकृतावर परिणाम होते आणि कावीळ होते. एखाद्या व्यक्तीला काविळ झाल्यास ताप, मळमळ सारख्या समस्या जाणवतात.

टायफॉईड

दूषित पाणी अस्वच्छ पदार्थ यामुळे टायफॉईड होतो. प्रामुख्याने हा आजार दुषित पाण्यामुळे होतो.

अशा घ्या काळजी –

  • नळाचे पाणी पिऊ नका. पाणी उकळवून प्या.
  • हात स्वच्छ करा. काहीही खाताना हात चांगले स्वच्छ करा.
  • भाज्या न धुता वापरू नका. फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी धुवून घेतल्यास अनेक आजार टाळता येतात.
  • जिथे राहताय तिथला परिसर स्वच्छ ठेवा.
  • आसपास घाण पाणी साचू देऊ नका, कारण याच पाण्यात डासांची उत्पत्ती होते.

हेही वाचा – पावसाळ्यात त्वचेची काळजी न घेतल्यास उद्भवतात हे गंभीर आजार



© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.