विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. सुदैवाने या अपघात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र, बसचं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नगरसेवकांना सहलीसाठी नेले जाते होतं. त्यावेळी नगरसेवकांची बस एका हॉटेलसमोर उभी असताना भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी चालकाला खाली उतरवून स्वतः स्टेअरिंग हातात घेतले. मात्र बस सुरू होताच त्यांचे नियंत्रण सुटले आणि बस थेट हॉटेलच्या भिंतीला धडकली. या अपघातात बसचे किरकोळ नुकसान झाले.
Chhatrapati Sambhajinagar: विधान परिषदेसाठी भाजपचा ‘नो रिस्क’ मोड, पंचतारांकित हॉटेलमध्ये साडेचारशे नगरसेवकांच्या उठल्या पंगतीसुदैवाने या कोणतीही जीवितहानी झाली नाही. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी नगरसेवकांना अज्ञातस्थळी नेले जात होते, अशी माहिती आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये 'हॉटेल पॉलिटिक्स'ची जोरदार चर्चा रंगली आहे.