Sanchita Ugale : एक्स बॉयफ्रेंडमुळे तणावात?,संचिता उगले त्यातून बाहेर आलीच नाही..सहकलाकाराचा दावा
admin June 16, 2026 01:24 AM
[ad_1]

Ujjawal Sharma On Sanchita Ugale: टीव्ही मालिकेतील उदयोन्मुख अभिनेत्री संचिता उगले हीच्या मृत्यूने तिच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. केवळ २२ वर्षाच्या वयात तिने जगाचा निरोप घेतल्याने चाहते आणि जवळच्या व्यक्तींना हा धक्का सहन होण्या पलिकडचा आहे. एकीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असताना आता दुसरीकडे तिच्या खाजगी जीवनाविषयी देखील निरनिराळ्या चर्चा सुरु आहेत. या दरम्यान संचिता हीच्या सोबत ‘साजन घर’ मालिकेत सह कलाकार म्हणून काम करणाऱ्या एका अभिनेत्याने एक मोठा खुलासा केला आहे.

संचिता आणि मी…काय म्हणाला उज्वल शर्मा?

संचित उगले ही टीव्ही मालिकेतील प्रसिद्धीच्या शिखरावरील अभिनेत्री होती. तिने ‘कुमकुम भाग्य’, ‘दिलवाली दुल्हा ले जाएगी’ आणि अनेक मालिकेत आपली छाप पाडून प्रेक्षकांची मने जिंकली होती.तिच्या मृत्यूने अनेकजण आता सोशल मीडियावर विविध चर्चा करत आहेत. यात सर्वाधिक चर्चा तिच्या कथित अफेअरची होत आहे. तिचे नाव आता तिचा को-स्टार उज्वल शर्मा याच्या सोबत जोडले जात आहे, मात्र उज्वल शर्मा याने त्यास नकार दिला आहे.

लिव-इन मध्ये रहात असल्याचा दावा

टेली चक्करशी बोलताना शर्मा याने स्पष्ट केले की माझ्यात आणि संचिता असे कोणतेही नाते नव्हते. उज्वल शर्मा पुढे म्हणाले की नात्याची अफवा आहे. यात काही सत्य नाही. आमचे कोणतेही नाते नव्हते. वास्तविक ती कोणा अन्य व्यक्तीला डेट करत होती. आणि उघडपणे त्याच्या सोबत रहात होती. मी तिच्याशी खूप काळ झाला बोललेलो नाही. जवळपास दोन ते अडीच महिन्यांपासून संपर्कात नाही. ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडमुळे चिंतेत होती आणि या प्रकरणात मदत देखील घेत होती. प्रोडक्शन हाऊसने देखील तिला उपचारासाठी मदत केल्याचे त्याने म्हटले आहे.

डिप्रेशनशचा सामना

संचिता उगले हिच्या खाजगी जीवनासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तिची मैत्रिण आणि सहकारी अभिनेत्री मेघा शर्मा हीने देखील दावा केला की संचिता गेल्याकाही दिवसांपासून डिप्रेशनचा सामना करत होती आणि ती मानसोपचार घेत होती. मेघा हीने सांगितले की ती अनेकदा मानसिक तणावाने जीव देण्याच्या गोष्टी करायची. मात्र, तिच्या जवळच्या व्यक्तींना वाटायचे की ती यातून बाहेर पडेल. पोलिसांना प्राथमिक तपासात कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. कुटुंबाने कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही.

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.