IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 7 रेकॉर्ड्स ब्रेक, महिला ब्रिगेडची ऐतिहासिक कामगिरी
GH News June 16, 2026 02:10 AM

आयसीसी वुमन्स टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत (Icc Womens T20i World Cup 2026) टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात महिला ब्रिगेडने 14 जून रोजी पाकिस्तानवर एकतर्फी फरकाने मात केली. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर 64 धावांनी मात केली. वुमन्स टीम इंडियाने यासह आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धची आकडेवारी आणखी मजबूत केली. टीम इंडियाचा हा पाकिस्तान विरुद्धचा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सातवा विजय ठरला. टीम इंडियाने सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय मिळवला.

सामन्यात काय झालं?

टीम इंडियाने या सामन्यात 170 धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 106 रन्सवर गुंडाळलं. भारताने अशाप्रकारे 2 गुणांची कमाई केली. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी 7 विक्रम केले. त्याबाबत जाणून घेऊयात.

भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा

कर्णधार हरमनप्रीत कौर माजी कॅप्टन मिताली राज हीला मागे टाकत भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. हरमनप्रीतच्या नावावर या स्पर्धेत 762 धावा आहेत. तर मितालीने या स्पर्धेत 726 धावा केल्या होत्या.

ऋचा घोषची सर्वात मोठी खेळी

ऋचा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहाव्या आणि त्या खालील स्थानी येऊन सर्वात मोठी खेळी करणारी पहिली महिला फलंदाज ठरली. ऋचाने पाकिस्तान विरुद्ध या सामन्यात 17 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 34 धावा केल्या.

टीम इंडियाची सर्वात मोठी धावसंख्या

टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध 170 धावा केल्या. भारताची ही टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धची सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

सर्वाधिक टी 20i विकेट्स

दीप्ती शर्मा हीने पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. दीप्तीने यासह टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे. दीप्तीच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये आता 166 विकेट्स आहेत.

स्मृती मंधाना हीने पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक 68 धावा केल्या. स्मृतीने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत हरमनप्रीत कौर आणि मिताली राज यांच्या सर्वाधिक अर्धशतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. या तिघींच्या नावावर आता टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येकी 5-5 अर्धशतकांची नोंद आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.