Layoff Rules : नोकरीवरून अचानक काढलं? सरकारचं ‘हे’ अ‍ॅप सांगेल तुमचे हक्क
Marathi June 16, 2026 04:25 PM

हल्ली अनेक मोठ्या कंपन्यांमधील कर्मचारी कपात आणि ले-ऑफच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अचानक नोकरी जाणे ही कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी धक्कादायक आणि चिंतेची बाब असते. अशा वेळी अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की, कंपनीने योग्य कारण न देता किंवा नियमानुसार प्रक्रिया न पाळता नोकरीतून काढून टाकल्यास काय करावे? अशा परिस्थितीत आपल्या कायदेशीर हक्कांची माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

‘न्याय सेतू’ अ‍ॅप म्हणजे काय?
भारतीय नागरिकांना कायदेशीर माहिती सहज आणि सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या न्याय विभागाने ‘न्याय सेतू’ (Nyaya Setu) अ‍ॅप सुरू केले आहे. अनेकांना कायदे, हक्क आणि उपलब्ध पर्यायांची पुरेशी माहिती नसते. हे अ‍ॅप अशा नागरिकांना आवश्यक कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देण्यास मदत करते.

कशी होईल मदत होईल?
जर एखाद्या कर्मचाऱ्याला कोणतेही स्पष्ट कारण न देता नोकरीतून कमी करण्यात आले किंवा कंपनीने ठरलेली प्रक्रिया पाळली नाही, तर ‘न्याय सेतू’ अ‍ॅपच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती श्रम कायद्यांअंतर्गत उपलब्ध हक्कांची माहिती मिळवू शकते. याशिवाय, अशा परिस्थितीत कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत, तक्रार कशी करावी आणि स्वतःचे हक्क कसे जपावेत याविषयीही मार्गदर्शन मिळू शकते.

घरबसल्या मिळेल कायदेशीर माहिती
या अ‍ॅपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे छोटी-मोठी कायदेशीर माहिती मिळवण्यासाठी कार्यालयांचे फेरे मारण्याची गरज भासत नाही. मोबाईलवरूनच आवश्यक माहिती सहज मिळू शकते. त्यामुळे नागरिकांना योग्य वेळी योग्य निर्णय घेणे सोपे होते.

‘न्याय सेतू’ अ‍ॅप डाउनलोड कसे कराल?
‘न्याय सेतू’ अ‍ॅप हे गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसेच कायदा आणि न्याय मंत्रालयाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर अ‍ॅपचा क्यूआर कोडही उपलब्ध करून दिला आहे. तो स्कॅन करूनही अ‍ॅप डाउनलोड करता येते.

जर तुम्हाला वाटत असेल की कंपनीने तुमच्यावर अन्याय करत चुकीच्या पद्धतीने नोकरीतून कमी केले आहे, तर घाबरण्याऐवजी सर्वप्रथम आपल्या हक्कांची माहिती घ्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.