ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्…त्या कृतीची सगळीकडे चर्चा!*
admin June 16, 2026 07:24 PM
[ad_1]

शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार फुटणार आणि ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रविवारी ‘मातोश्री’ वर झालेल्या बैठकीला केवळ 5 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 4 खासदार ऑनलाइन जोडले गेले होते. यानंतर खासदार संजय देशमुख यांनी दिल्ली गाठून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे. या सर्व घडामोडींवर बोलताना राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी ‘ऑपरेशन टायगर’ संदर्भात भाष्य केले. सरनाईक म्हणाले ‘ऑपरेशन टायगर’ सुरुच असतं कोणीना कोणी येत जात असतंच, मात्र आमच्या पक्षात ज्यांना यायचं आहे त्यांच्यासाठी पक्षाचे दार २४ तास खुले आहे. त्यांचे स्वागत आहे. या दरम्यानच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.

यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्र्याना वारंवार ‘ऑपरेशन टायगर’बबात विचारण्यचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी बोलणं टाळलं. यानंतर त्यांनी हात हालवत नकार दिला आहे. त्यांच्या या मौन प्रतिक्रियेनंतर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान प्रताप सरनाईक आणि शिंदे यांच्यात ‘ऑपरेशन टायगर’ तसेच नवी मुंबईतील प्राकारबबात चर्चा झाली अशी सुत्रांची माहिती आहे.


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.