What happened between Vaibhav Sooryavanshi and Sri Lanka players? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीला भारताच्या अ संघात संधी मिळाली, परंतु श्रीलंका दौऱ्यावरील तिरंगी मालिकेत फलंदाजीतील कामगिरीपेक्षा तो एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. श्रीलंका अ संघाविरुद्ध सोमवारी सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या सामन्यात वैभव आणि यजमान खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर काही खेळाडू पुन्हा भारताच्या युवा फलंदाजाकडे गेले अन्... या प्रकरणातील ताजे अपडेट्स समोर आले आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २६५ धावांपर्यंत मजल मारली. ७ फलंदाज १४३ धावांवर माघारी परतले असताना सूर्यांश शेडगे ( ७२) व विपराज निगम ( ५१) यांच्या शतकी भागीदारीने संघाला सावरले. लक्ष्याचा पाठलाग करताना सदीरा समरविक्रमाने ९३ धावांची खेळी करून भारताला कडवी टक्कर दिली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना अखेर सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला.
श्रीलंकेने सुपर ओव्हरमध्ये १६ धावा केल्या आणि भारताला ९ धावाच करता आल्या. या सामन्यात वैभव व श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये धक्काबुक्की झालेली पाहायला मिळाली. १५ वर्षीय वैभवही आक्रमक पवित्र्यात दिसला आणि त्यामुळे त्याच्यावर आयसीसी कारवाई करेल अशी चर्चा रंगली. पण, तसं होण्याची शक्यता कमीच आहे. श्रीलंकेचा खेळाडू विशेन हलंबगे सातत्याने वैभवला डिवचत होता. पहिल्या सामन्यातही त्याने ही कृती केली होती आणि त्यामुळे काल वैभव प्रचंड चिडला.
IND A vs AFG A : जर वैभव सूर्यवंशीवर बंदी आली, तर भारताकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला जागा मिळणार?सुपर ओव्हरमध्ये वैभव सलामीला फलंदाजीसाठी आला तेव्हाही त्याने शाब्दिक हल्ला सुरूच ठेवला. हलंबगेने फलंदाजाला, "घरी जा, ही आयपीएल नाही," असे म्हटल्याचे वृत्त समोर येत आहे. आता हाती आलेल्या अपडेट्नुसार हलंबगेसह श्रीलंकेचे काही खेळाडू वैभवकडे घडलेल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त करायला गेले. हे श्रीलंकन खेळाडू त्रिकोणीय मालिकेत सहभागी असलेल्या श्रीलंका 'अ' संघाचे सदस्य नाहीत, पण आयपीएलमधीलमध्ये खेळणारे आणि वैभवला ओळखणारे वरिष्ठ क्रिकेटपटू आहेत. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार श्रीलंकेच्या खेळाडूंनी त्याची माफी मागितली आहे.