वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 
राजू सोनावणे June 16, 2026 10:13 PM

Bhiwandi Crime News :  राज्यभरात आज दोन विभागांनी धडक कारवाई केली आहे. भिवंडीत एफडीए तर वडाळ्यात शिधा वाटप नियंत्रक विभागानं कारवाई केली आहे. भिवंडीत बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा साठा तर वडाळ्यात विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. भिवंडीत 1 कोटी 53 लाख तर वडाळ्यात 1 कोटी 23 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह पुरवठा नियंत्रक विभागाचे चंद्रकांत डांगे यांनी ही कारवाई केली आहे. 

वडाळ्यात जप्त केलेला साठा 

विमानाचे इंधन (ATF): 29000 लिटर
डिझेल: 14000 लिटर
पेट्रोल: 10000 लिटर
एकूण जप्त मुद्देमाल: 1 कोटी 31 लाख

भिवंडीत जप्त केलेला साठा

लहान मुलांसाठी बनवलेली बोगस उत्पादने
मुलांच्या केसांची व त्वचेची काळजी घेणारी उत्पादने (जसे की Peppa Pig मालिका, शॅम्पू, लोशन, पावडर, सनस्क्रीन) आणि पुरुषांची उत्पादने ('KT Men') विक्रीसाठी साठवून ठेवलेली आढळली.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.