40 मिनिटात भूकंपाचे 8 मोठे धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण; प्रशासनाचा तत्काळ मोठा निर्णय!
Tv9 Marathi June 16, 2026 11:45 PM

China Earthquake : चीनमधून सर्वात मोठी आणि धक्कायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे अवघ्या 40 मिनिटांमध्ये भूकंपाचे तब्बल 8 धक्के जाणवले आहेत. यातील सर्वात शक्तिशाली धक्का हा 6.3 रिश्टर स्केल एवढा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून साधारण 10 किमी खोल आहे. चीनमधील स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार भूकंपाचे धक्के बसताच तेथील प्रशासनाने सगळीकडे सतर्कतेचा इशारा दिला आहे. बचावकार्य करणाऱ्या दलांना तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चीनमधील नॉर्थ-वेस्ट
क्षेत्रातील किंघाई प्रांतात भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत.

भूकंपात नेमकं काय घडलं?

चीनमधील वर्तमानपत्र ग्लोबल टाईन्सने दिलेल्या माहितीुसार किंघाई प्रांतात मंगळवारी स्थानिक वेळ 6.40 वाजता भूकंपाचे हे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र राजधानी शियांगपासून 567 किमी दूर आहे. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. सरकारने बाचावकार्य सुरू केले आहे. या घटनेला गांभीर्याने घेऊन प्रशासन कामाला लागले आहे. तसेच कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या सर्वच कामागारांनी काम थांबवून बाहेर यावे, असा आदेश देण्यात आला आहे.

बचावकार्य करण्यासाठी दोन विशेष गाड्या

या भूकंपांच्या धक्क्यांमध्ये जीवित तसेच वित्तहानी किती झाली, याची मोजणी सरकारकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्यातरी बचावकार्य करण्यासाठी दोन विशेष गाड्या तसेच 10 बचावकार्य करणाऱ्या जवानांना पाठवण्यात आले आहे. सध्या किती नुकसान झालेले आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रशासन पुढील निर्णय घेणार आहे.

किंघाई प्रांत नेमका कुठे आहे?

चीनमधील नॉर्थ-वेस्ट परिसरात हा प्रदेश आहे. तिबेट पठाराच्या किनाऱ्यावर हा प्रदेश स्थित आहे. भूवैज्ञानिक दृष्टीकोनातून हा एक गुंतागुंतीचा प्रदेश मानला जातो. भूकंपाच्या दृष्टीकोनातून हा प्रदेश खूपच संवेदनशील मानला जातो. या भागात भूकंप होण्याचे प्रमाण खूप आहे. परंतु यावेळी भूकंपाचे सलग आठ धक्के बसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. परंतु स्थानिक प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असून कठीण प्रसंगी मदतकार्य तसेच बचावकार्य करण्यास आम्ही सज्ज आहोत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.