काही दिवसांपूर्वी मुंबईत कलिंगड खाल्ल्याने कुटुंबातील सर्वच सदस्यांचा मृत्यू झाला होता. तपासानंतर त्या कलिंगडमध्ये उंदीर मारण्याच्या औषधासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाचा अंश असल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता अशाच प्रकारची धक्कादायक घडना घडली आहे. मुंबईतील गिरगाव येथील दोन वर्षांची चिमुरडी सध्या मृत्यूशी झुंज देत असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. तांदळाच्या डब्यात उंदीर आणि कीटकांपासून संरक्षणासाठी ठेवलेल्या ‘ॲल्युमिनियम फॉस्फाइड’ या विषारी कीटकनाशकाच्या वासामुळे तिला विषबाधा झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
छोटी मुलगी अॅडव्हान्स लाईफ सपोर्टवरमिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलीला १५ तासांच्या कालावधीत तब्बल तीन वेळा हृदयविकाराचा झटका (कार्डियाक अरेस्ट) आला आहे. गंभीर अवस्थेत तिला हाजी अली येथील एनएच एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या ती अॅडव्हान्स लाईफ सपोर्टवर आहे. दोन दिवसांपासून तिला उलट्या आणि जुलाब होत होते. यामुळे मुलीला गंभीर निर्जलीकरण झाले होते. मुलीच्या मोठ्या बहिणीलाही त्याच काळात उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाला होता, मात्र ती दोन दिवसांत बरी झाली होती.
पुड्या ठेवल्यानंतर घरात तीव्र वासमुलीच्या नातेवाईकांपैकी एका डॉक्टरांनी घरातील तांदळाच्या साठवणुकीत ॲल्युमिनियम फॉस्फाइडच्या पुड्या ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. या पुड्या ठेवल्यानंतर घरात तीव्र वास येत होता. त्यानंतरच दोन्ही मुलांना त्रास सुरू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
फॉस्फाइड हे खूप घातक असतेहे प्रकरण समोर आल्यानंतर कामा हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ तुषार पालवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ॲल्युमिनियम फॉस्फाइडच्या अनेक गोळ्या या तांदळाच्या डब्यात ठेवण्यासाठी वापरल्या होत्या. फॉस्फाइड हे खूप घातक असते. फॉस्फाइडमुळे त्रास होतो. माणसाला धाप लागते. त्यामळे हगवण लागते. हाच त्रास दोन्ही बहिणींना सोबत झाला होता. आता मोठ्या बहिणीची प्रकृती चांगली आहे, अशी माहिती तुषार पालवे यांनी दिली.
तिला किडनी फेल्यूअर झालेतसेच, काही मिलीग्रॅण फॉस्फाइड जरी शरीरात गेले तरी ते घातक असते. १५० मिली ३०० मिलीग्रॅम फॉस्फाइडमुळे मोठ्या व्यक्तीचादेखील मृत्यू होऊ शकतो. सध्या उपचार सुरू अससलेल्या मुलीला बाहेरुन ऑक्सिजन दिला जातोय. तिच्या किडनीवरदेखील परिणाम झाला आहे. तिला किडनी फेल्यूअर झाले आहे. तिचा ब्रेन डॅमेज झाला नसेल तर ती यातून बाहेर येऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच फॉस्फाइडहे डब्यात ठेवल्यामुळे त्याच्या वाफा तयार झाल्या. आपण जेव्हा अश्या गोष्टी घरात ठेवतो तेव्हा त्यापासून लहान मुलांना दूर ठेवावे, असा सल्लादेखील त्यांनी दिला.