पेद्री, गावी, फेरान टोरेस आणि यामाल यांसारख्या खेळाडूंना रोखणे हे कोणत्याही गोलकीपरसाठी एक आव्हानात्मक कामच आणि तेही वयाच्या ४० व्या वर्षी आणि देशाच्या पहिल्या फिफा वर्ल्ड कप सामन्यात करणं आणखीनच कठीण. पण ही किमया करून दाखवलीय केप वर्देच्या वोझिन्हाने.
सोमवारी (१५ जून) फिफा वर्ल्ड कपमधील (FIFA World Cup) पदार्पणाच्या सामन्यात केप वर्देने स्पेनसारख्या (Cape Verde) बलाढ्य संघाला ०-० असं बरोबरीत रोखलं. तेव्हा हा व्हेझिन्हा (Vozinha) गोलपोस्टसमोर आनंदाश्रू ढाळताना दिसला होता.
Fifa World Cup 2026 : स्पेन साखळी फेरीतच घरी जाणार? दुबळ्या केप व्हर्दे संघाने 'बरोबरी'त रोखल्याने माजी विजेत्यांचे समीकरण बिघडलेअसा देश ज्यांची लोकसंख्या फक्त ६ लाखाच्या आसपास आहे, त्या देशासाठी फिफा वर्ल्ड कपची पात्रता मिळवणं मोठी गोष्ट आणि त्यातही पहिल्याच सामन्यात बरोबरी करणं ही खरंतर ऐतिसिकच गोष्ट आहे. या सामन्यात स्पेनकडून गोलसाठी तब्बल २७ प्रयत्न झाले, पण केप वर्देचा बचाव इतका भक्कम होता की एकही गोल झाला नाही, यात मोठं योगदान होतं वोझिन्हाचं.
कोण आहे हा वोझिन्हा?अनेकांना माहिती नाही की वोझिन्हा नक्की कोण आहे. तर त्याचं पूर्ण नाव नाव आहे जोसिमार जोस एव्होरा डायस. पण त्याच्या आजी-आजोबांमुळे त्याला वोझिन्हा हे टोपननाव मिळालं. ज्याचा अर्थ पोर्तुगिज भाषेनुसार आजीचा लाडका असा अर्थ होतो.
वोझिन्हाचे वडील लष्करात होते, तर आई देखील नोकरी करायची. त्यामुळे वोझिन्हा त्याच्या आजी-आजोबांसोबतच केप वर्देमधील साओ व्हिन्सेंटमध्ये लहानाचा मोठा झाला. तिथेच त्यानं वयानं मोठ्या मुलांसोबत खेळताना फुटबॉलचं कौशल्य आत्मसात केलं.
पण तरी त्याला पंचविशीपर्यंत प्रोफेशनल फुटबॉलमध्ये संधी मिळाली नव्हती. पण नंतर अंगोलामध्ये त्याला पहिली संधी मिळाली. त्यावेळी तेथील त्याच्या क्लबमधये जोसिमार नावाचा आणखी एक गोलकिपर होता. त्यामुळे त्याने त्याचं टोपन नावच प्रोफोशनल फुटबॉलमध्ये कायम ठेवलं. पुढे तो सायप्रस, स्वोवाकिया, मालडोवा आणि पोर्तुगाल या देशांमधील क्लबमध्येही खेळला. तो एकूण ९ क्लबमध्ये खेळला. सध्या तो पोर्तुगालच्या द्वितीय-स्तरीय फुटबॉल लीगमध्ये चावेससाठी गोलकिपर म्हणून खेळतो.
Fifa World Cup : एका राजाने निवडला संघ... खेळाडूंवरील गुन्हे माफ अन् इंग्लिश तेल कंपनी बंद पाडण्याची धमकी; १९३० च्या वर्ल्ड कपचा रंजक किस्सा तुम्ही ऐकला नसेल...दरम्यान २०१२ पासून तो केप वर्देचा पहिल्या पसंतीचा गोलकिपर ठरला. पण काही महिन्यांपूर्वी आफ्रिका कप ऑफ नेशन्सच्या पात्रता फेरीत संघातील स्थान गमावल्यावर त्याच्या डोक्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीचा विचारही आलेला, पण संघसहकाऱ्यांनी त्याला प्रेरणा दिली. वर्ल्ड कप खेळण्याचे सर्वांचेच स्वप्न होतं.
त्यासाठी त्याने खेळणं सुरू ठेवलं आणि आता त्याचा खेळ फिफा वर्ल्ड कपमधून आख्ख्या जगानं पाहिला. त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये एका रात्रीत झपाट्यानं वाढ झालीये. केप वर्दे विरुद्ध स्पेन सामन्यापूर्वी त्याचे इंस्टाग्राम फॉलोवर्स ४५ हजाराच्या आसपास होते. पण या सामन्यानंतर तब्बल ५६ लाख फॉलोवर्स त्याचे झाले आहेत.
एकूणच त्यानं दाखवून दिलं की वय हा केवळ एक आकडा असतो आणि स्वप्नांचा पाठलाग करायला कधीच उशीर होत नाही.