*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*
☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार
☀️ सूर्योदय – ०६:०१
☀️ सूर्यास्त – १९:०७
चंद्रोदय – ०८:०६
⭐ प्रात: संध्या – ०४:४९ ते ०६:०१
⭐ सायं संध्या – १९:०७ ते २०:१९
⭐ अपराण्हकाळ – १३:५२ ते १६:२९
⭐ प्रदोषकाळ – १९:०७ ते २१:१७
⭐ निशीथ काळ – ००:१२ ते ००:५५
⭐ राहु काळ – १२:३४ ते १४:१२
⭐ यमघंट काळ – ०७:३९ ते ०९:१७
♦️ लाभदायक----
लाभ मुहूर्त– ०६:०१ ते ०७:३९
अमृत मुहूर्त– ०७:३९ ते ०९:१७
विजय मुहूर्त— १४:४५ ते १५:३७
⏳ कार्यसिद्धी वेळा – ०९:१७ ते १२:०७ | १४:४५ ते १८:१४ | १९:०७ ते २२:०१
⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:०१ ते ०८:३८ | १२:०७ ते १४:४५ | १८:१४ ते १९:०७ | २२:०१ ते २४:००
मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ०८:१० ते १५:०० | ओहोटी: १५:०० ते २१:४६ | भरती: २१:४६ ते २७:३० | ओहोटी: २७:३० ते ०९:१६
ग्रहमुखात आहुती – सूर्य (अशुभ) १६:५४ नं. बुध (शुभ)
अग्निवास – पृथ्वीवर २५:३५ पर्यंत नंतर आकाशात
️ शिववास – २५:३५ पर्यंत सभेत असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर क्रीडेत असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे
शालिवाहन शक १९४८
संवत्सर पराभव
अयन – उत्तरायण
ऋतु – ग्रीष्म
मास – शुद्ध ज्येष्ठ
पक्ष - शुक्ल पक्ष
तिथी – तृतीया (२५:३५ नं.) चतुर्थी
वार – बुधवार
नक्षत्र – पुनर्वसू (१६:५४ नं.) पुष्य
योग – ध्रुव (२४:१२ नं.) व्याघात
करण – तैतिल (१४:३९ नं.) गरज
चंद्र रास – मिथुन (११:१४ नं. कर्क)
सूर्य रास – मिथुन
गुरु रास – कर्क
दिनविशेष पंचाग्नि-लवण-त्रिविक्रम तृतीया व्रत, रंभातृतीयाव्रत, महाराणा प्रताप जयंती, रवियोग १६.५४ नं.
✅विशेषआपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या हातून घडणाऱ्या बऱ्या-वाईट कर्मांचा हिशेब आपल्या खात्यावर जमा होत राहतो. आणि त्यातून जमा होणाऱ्या पाप-पुण्याची फळे भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो असे हिंदू धर्मातील तत्वज्ञान सांगते. असा पुनर्जन्म खरोखर मिळतो का? मिळाल्यास कोणत्या ठिकाणी, कोणत्या अवस्थेत मिळतो अशा शंका सामान्यतः प्रत्येकाच्या मनात उद्भवतात.
पुनर्जन्माविषयी भारतामध्ये प्राचीन काळापासून अनेक ग्रंथांमध्ये विविध अभ्यासकांनी आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. अलीकडे तर पाश्चात्य जगातही अनेक तज्ज्ञांनी या विषयामध्ये सखोल अभ्यास करून त्याविषयी ग्रंथनिर्मिती केलेली दिसते. पुनर्जन्म ही एक अंधश्रद्धा आहे असं म्हणणारा एक वर्ग आणि दुसरीकडे या संकल्पनेला पुष्टी देणाऱ्या इतिहासातील काही वैशिष्ट्यपूर्ण घटना यांचा परामर्श घेऊन सविस्तर माहिती सांगणारा हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलो आहोत. जाणून घेऊ या पुनर्जन्माचं रहस्य श्री. गौरव देशपांडे
https://youtu.be/M4yZN8XVKUw?si=ModnNsG-JHF7LYR-
शुभाशुभ दिवस - शुभ दिवस
श्राद्ध तिथी - तृतीया श्राद्ध
आजचे वस्त्र – हिरवे
स्नान विशेष – गहूला वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.
उपासना –नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा.
दान – सत्पात्री व्यक्तीस निळे वस्त्र, सुवर्ण, कांस्यपात्र, मूग, फुले दान करावे
तिथीनुसार वर्ज्य – पडवळ, मांस
दिशाशूल उपाय – दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा करण्यापूर्वी तीळ भक्षण करून बाहेर पडावे.
चंद्रबळ – मेष , वृषभ , मिथुन , सिंह , कन्या , तुळ , धनु , मकर , कुंभ — या राशींना ११:१४ पर्यंत चंद्रबळ अनुकूल आहे.
चंद्रबळ (पुढे) – वृषभ , मिथुन , कर्क , कन्या , तुळ , वृश्चिक , मकर , कुंभ , मीन — या राशींना ११:१४ नंतर चंद्रबळ अनुकूल आहे