Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागासाठी पेयजल धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ निर्णय
esakal June 17, 2026 11:45 AM
Drinking Water Policy : ग्रामीण भागासाठी पेयजल धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ निर्णय

Latest Marathi Live Updates 17 June 2026 : राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या ‘महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६’ला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार राज्यात राबविल्या जात असलेल्या जलजीवन मिशन २.० मधील योजनांच्या देखभाल दुरूस्तीसाठी सर्वंकष आराखडा तयार केला जाणार असून या धोरणांतर्गत राज्यात जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांकरिता पाणीपुरवठ्याचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.