Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंचे 7 खासदार फुटण्याची शक्यता
Sarkarnama June 17, 2026 12:45 PM
मस्साजोगाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काल रात्रीपासून सुरू झालेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेने दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा दिवसभर रंगत राहिली. रात्री उशीरा ठाकरेंचे सहा खासदार अचानक नॉट रिचेबल झाल्याने ऑपरेशन टायगरवर जवळपास शिक्कामोर्तब झाले.