Argentina vs Algeria Fifa World Cup 2026 Marathi Football News : अर्जेंटिनाचा संघ कॅन्सस सिटीमधील ॲरोहेड स्टेडियमवर अल्जेरियाविरुद्ध आपल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ विजेतेपदाच्या बचावाला सुरुवात करत आहे. जगातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ( Lionel Messi ) आणि त्याचे सहकारी या वर्ल्ड कप स्पर्धेत उतरताना उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि ब्राझीलनंतर (१९६२) वर्ल्ड कप विजेतेपद राखणारा पहिला संघ बनण्याचे त्यांचे ध्येय आहे. तेच, अल्जेरिया २०१४ नंतर प्रथमच विश्वचषकात सहभागी होत आहे. पण, या सामन्यासाठी मैदानावर उतरताच मेस्सीने वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.
मेस्सी मैदानावर उतरला तो, सहा वर्ल्ड कप खेळणारा जगातील पहिल्या खेळाडूचा मान पटकावत.. अर्जेंटिनाच्या या सुपरस्टारने २००६ ते २०२६ या कालावधीत सहा वर्ल्ड कप खेळले आणि २०२२ मध्ये जेतेपदाचे स्वप्नही पूर्ण केले. मेक्सिकोच्या ग्युइलेर्मो ओचोआ याला सहा वर्ल्ड कप खेळणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावता आला असता, परंतु मेक्सिकोने त्याला पहिल्या सामन्यात बाकावर बसवले... आज संध्याकाळी काँगोविरुद्ध मैदानावर उतरताच पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डोही हा विक्रम नावावर करेल.
France vs Senegal : किलियन एमबापेने मोडला मेस्सीचा विक्रम अन् नोंदवले २ वर्ल्ड रेकॉर्ड; मुंबईपेक्षा लहान देशाची फ्रान्सला कडवी टक्करमेस्सीने २००६ मध्ये जर्मनीत झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतून आपल्या प्रवासाची सुरुवात केली होती. त्यानंतर २०१०, २०१४, २०१८, २०२२ आणि आता २०२६ अशा सलग सहा वर्ल्ड कपमध्ये त्याने अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले आहे. अल्जेरियाविरुद्ध मैदानावर उतरताच, तो अर्जेंटिनाकडून २०० वा सामना खेळणारा पहिला खेळाडू ठरला. त्याने संघासाठी सर्वाधिक ११७ गोल व सर्वाधिक ६१ सहाय्य केले आहेत. २०० सामने खेळणारा तो जगातील तिसरा ( रोनाल्डो २२८ व कुवैतचा बादेर अल-मुतावा २०२) खेळाडू ठरला.
वर्ल्ड कप स्पर्धेत पाच मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणारा मेस्सी, हा जगातील पहिलाच खेळाडू आहे. शिवाय स्पर्धेच्या प्रत्येक टप्प्यात ( साखळी फेरी, उप उपांत्यपूर्व, उपांत्यपूर्वी, उपांत्य फेरी व अंतिम फेरी) गोल करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. आजच्या दिवशी २० वर्षांपूर्वी मेस्सीने वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केले होते आणि त्या सामन्यात त्याने बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरून गोल केला होता. मेस्सीने अल्जेरियाविरुद्ध १७ व्या मिनिटाला गोल करून किलियन एमबापेच्या वर्ल्ड कपमधील १४ गोलच्या विक्रमाशी बरोबरी केली. काही तासांपूर्वीच फ्रान्सच्या खेळाडूने दोन गोल करताना मेस्सीला मागे टाकले होते.
एर्लिंग हालंडची स्वप्नवत सुरूवात, नॉर्वेचा ४-१ ने विजय२८ वर्षानंतर फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या नॉर्वेने बुधवारी मध्यरात्री इराकवर ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. एर्लिंग हालंड ( Erling HAALAND) हा या सामन्यातील नायक ठरला... पहिलाच वर्ल्ड कप सामना खेळणाऱ्या एर्लिंगने दोन ( २९ व ४३ मि.) गोल केले व एका गोलसाठी सहाय्य केले. त्याच्यासह लिओ ऑस्टिगार्ड ( ७६ मि.) ने एक गोल केला.
४० वर्षानंतर वर्ल्ड कप खेळणाऱ्या इराकसाठी आयमेन हुसैनने ( ३९ मि.) एकमेव गोल केला, परंतु त्याच्याच ( ९०+६ मि.) स्वयंगोलने नॉर्वेचा ४-१ असा विजय पक्का केला. वर्ल्ड कपच्या एकाच सामन्यात गोल व स्वयंगोल करणारा हुसैन हा तिसरा ( मारिओ मँझुकीच, क्रोएशिया वि. फ्रान्स, २०१८ आणि एर्नी ब्रँड्स, नेदरलँड्स वि. इटली, १९७८) खेळाडू ठरला.