मुंबई : बेस्ट उपक्रमात विविध पदांसाठी मोठी भरती सुरू असल्याचा एक बोगस संदेश समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल झाला आहे. या संदेशावर विश्वास ठेवून शेकडो बेरोजगार तरुणांनी मुंबईतील बेस्टच्या मुख्यालयात धाव घेतल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
अर्ज सादर करण्यासाठी आणि चौकशीसाठी बेस्टच्या आवक-जावक विभागात तरुणांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, यामुळे आधीच मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या बेस्टप्रशासनाच्या डोक्याला चांगलाच ताप झाला आहे.
Mumbai-Goa Highway : चिपळूणकरांना मोठा दिलासा! मुंबई-गोवा हायवेवर यंदा पाणी तुंबणार नाही; प्रशासनानं उचललं 'हे' पाऊल, अपघाताच्या धोक्यांनाही 'ब्रेक'समाजमाध्यमावरील या खोट्या संदेशामुळे अचानक अर्जदारांची संख्या अभूतपूर्व प्रमाणात वाढली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आलेल्या अर्जाची हाताळणी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाला तातडीने आवक-जावक विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी लागली.
आर्थिक व्यवहार करू नयेतबेस्ट उपक्रमाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की समाजमाध्यमांवर बेस्ट उपक्रमातील विविध पदांच्या भरतीबाबत प्रसारित होणारे संदेश पूर्णपणे बोगस असून, ते प्रशासनाने जारी केलेले नाहीत. नागरिकांनी अशा कोणत्याही संदेशांवर विश्वास ठेवू नये. बेस्ट उपक्रमातील कोणत्याही भरतीसंदर्भातील माहिती 'बेस्ट'च्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येते. तसेच नोकरीच्या प्रलोभनाला बळी पडून उमेदवारांनी कसलाही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन 'बेस्ट' प्रशासनाने केले आहे.
Mumbai Local: प्रवाशांचे हाल होणार! शेवटची खोपोली लोकल दोन महिन्यांसाठी रद्द, आठवड्यातून तीन दिवस विशेष ब्लॉक