विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय
esakal June 17, 2026 06:45 PM

Nandigram Express: विदर्भ, मराठवाड्यातून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने आता मुंबई-बल्लारशाह-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस (क्रमांक ११००१/११००२) मध्ये अत्याधुनिक 'लिंक हॉफमन बुश' म्हणजेच एलएचबी कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे.

नंदीग्राम एक्स्प्रेस ही विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. आतापर्यंत या गाडीत जुन्या प्रकारातील आयसीएफ डब्यांचा वापर केला जात होता. त्यामुळे प्रवाशांना धक्के, अधिक आवाज आणि काही प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, एलएचबी कोचमुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक सुविधांनी युक्त होणार आहे. अपघाताच्या प्रसंगी हे डबे अधिक सुरक्षित मानले जातात.

महाराष्ट्र एक्सप्रेस २ तास उशीरा धावणार, चार रेल्वे गाड्या रद्द, गुरुवारी मध्यरेल्वेचा विशेष ब्लॉक

नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये एलएचबी कोचचा समावेश व्हावा, यासाठी अनेक स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. किनवट येथील उपसरपंच तथा खासदारांचे स्वीय सहायक कर्तार साबळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदन सादर करून ही मागणी लावून धरली होती.

Railways Fare Hike : आता रेल्वेचा प्रवासही महागणार! स्लीपर ते एसी कोचच्या तिकीट दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर...

अखेर रेल्वे प्रशासनाने या मागणीची दखल घेत नंदीग्राम एक्स्प्रेसचे एलएचबी कोचमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एलएचबी कोच असलेली गाडी आता १७ जून पासून बल्लारशहाहून सुरु होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.