IND A vs AFG A: भारताचा अ(IND A) संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिथे त्रिदेशीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना आज भारत आणि अफगाणिस्तान अ संघ यांच्यात खेळला जात आहे.
या सामन्याला भारतीय संघासाठी विशेष महत्त्व असून अंतिम फेरीच्या दृष्टीने विजय मिळवणे भारतासाठी गरजेचे आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा कर्णधार दरविश रहमान याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारताच्या युवा फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत संघाला दमदार सुरुवात करून दिली.
IND A vs SL A, ODI: महागात पडली १० धावांची पेनल्टी; भारताने हातातला सामना सुपर ओव्हरमध्ये गमावला...भारताकडून डावाची सुरुवात करणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या यांनी पहिल्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. या सामन्यातही वैभवने चांगली सुरुवात केली. मात्र, मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले.
त्याने ३८ धावांचे योगदान दिले. दुसऱ्या बाजूला प्रियांश आर्याने संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे मिश्रण दाखवत ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीत ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
त्यानंतर भारतीय अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा याने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ७५ चेंडूत ५९ धावांची खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्याच्या खेळीत ४ चौकारांचा समावेश होता. याशिवाय कुमार कुशाग्र यानेही शानदार फलंदाजी करत ५८ धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनी देखील चांगले योगदान दिल्यामुळे भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ९ विकेट्स गमावत ३१९ धावांचा मोठा डोंगर उभा केला.
IND A vs SL A, ODI: शेवटच्या चेंडूवर मोठा ड्रामा अन् मग सुपर ओव्हरचा थरार... अखेर भारताचा सलग दुसरा पराभव; आता फायनल कशी गाठणार?तिघांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तान अ संघासमोर विजयासाठी ३२० धावांचे आव्हान ठेवले आहे. आता या सामन्यात विजय मिळवायचा असेल, तर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना मोठी कामगिरी करावी लागणार आहे. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज या मोठ्या धावसंख्येचे यशस्वीपणे संरक्षण करत आणखी एका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरतील.