खासदार ओमराजे निंबाळकर कोणत्या कारणामुळे फुटीर झाले? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट
Saam TV June 17, 2026 06:45 PM
  • ओमराजे निंबाळकर फुटीमागचे कारण काय

  • संजय राऊतांचा १५ कोटींचा खळबळजनक दावा

  • फुटीर खासदारांवर ठाकरे गटाची कारवाई

सहा खासदारांना वेगळा गट स्थापन करण्यास लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली असून ते सर्व खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा आहे. या सर्व राजकीय घडामोडीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. हे सहाही खासदार मंगळवारी सायंकाळी आणि मध्यरात्रीपर्यंत विविध मार्गाने दिल्लीला रवाना झाले होते.

६ खासदारांनी साथ सोडली, आता पुढे काय कारवाई करणार? अरविंद सावंतांनी सांगितला सगळा प्लॅन

या सगळ्या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे यांनी दिल्लीत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीतून संजय राऊतांनी फुटीर गटाला अप्रत्यक्ष कारवाईचा इशारा दिला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी खळबळजनक दाव्या केले आहेत, फुटीर खासदारांना मंगळवारी रात्री प्रत्येकी १५ कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर ते सर्वजण दिल्लीत गेले, असा दावाही राऊतांनी केला.

यासह संजय राऊतयांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कसल्या प्रकारचा दबाव होता, याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. वीस वर्षापूर्वी त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली होती. २० वर्षापासून हा खटला मुंबई हायकोर्टात सुरू आहे. काल यावर निकाल होता. मुंबई हायकोर्टात निकालाचा दिवस ठरला पण अचानक पुढे ढकलण्यात आला."

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; फुटीर ६ खासदार शिवसेनेत विलीन होणार!

संजय राऊत यावर बोलताना अजून एक धक्कादायक खुलासा केला. ओमराजेंनाएका व्यक्तीकडून निकालाबाबत एक संदेश देण्यात आला. जर तुमच्या बाजुने निकाल हवा असेल, तर आमच्या गटात सामील व्हा, आम्ही तुम्हाला हवा तसा निकाल देतो. असा संदेश ओमराजेंना देण्यात आला. हा निकाल तुमच्या बाजुने हवा असेल तर तर स्वाक्षरी करा आणि आमच्यासोबत या, असे सांगण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.