सोलापूर : राज्यात मॉन्सूनचे आगमन झाले असले, तरी अद्याप सर्वदूर जोरदार पाऊस सुरू झालेला नाही. पावसाच्या या विलंबाचा अनपेक्षित फायदा कर्नाटकातील हापूस आंब्याला झाला (Solapur mango market price today) असून, सोलापूरच्या बाजारात जून महिन्याच्या मध्यातही त्याला चांगली मागणी आणि समाधानकारक दर मिळत आहेत. मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात कर्नाटकी हापूसचे दर प्रतिडझन ४०० रुपयांपर्यंत आहेत.
सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाला सुरुवात होताच कर्नाटकातील हापूस आंब्याचा हंगाम उतरणीला लागतो. पावसामुळे आंब्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणावर हा आंबा प्रक्रिया उद्योगाकडे वळविला जातो. मात्र, यंदा पावसाने उशीर केल्याने दर्जेदार आंब्याची आवक अद्याप सुरू आहे.
Pune-Bangalore Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा उड्डाणपूल अखेर सुरू होणार; 'लोड टेस्टिंग'साठी 35 टनांच्या 12 गाड्या 24 तास केल्या उभ्या, प्रवाशांना दिलासादुसरीकडे, रत्नागिरी आणि देवगड हापूसचा हंगाम संपुष्टात आल्याने बाजारातील रिक्त जागा कर्नाटकी हापूसने भरून काढली आहे. गावरान हापूसची उपलब्धताही मर्यादित असल्याने ग्राहकांचा कल कर्नाटकी हापूसकडे वाढला आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरीसही या आंब्याला चांगली मागणी कायम आहे.
कोकण हापूसचे दर वाढलेरत्नागिरी, देवगड हापूस शहरातील मोजक्याच विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. थेट कोकणातून खरेदी करणाऱ्या विक्रेत्यांचा यात समावेश आहे. सध्या रत्नागिरी हापूसचा दर प्रतिडझन ७०० ते १००० रुपयांपर्यंत तर देवगड हापूसच्या १०, १२ व १५ आंब्यांच्या पेटीचे दर एक हजार रुपयांवर पोचले आहेत. रत्नागिरी केशर प्रतिकिलो २४० रुपयांनी विकला जात आहे.
ग्राहकांची पसंती अजूनही हापूसलाचकोकणातील हापूस सोलापूरच्या बाजारात अल्प प्रमाणात असतानाही आंबाप्रेमींची हापूसची मागणी कायम आहे. त्यामुळे कर्नाटकातील बागांमधून येणारा हापूस आंबा सध्या सोलापूर बाजारातील प्रमुख आकर्षण ठरत असून, पाऊस सुरू होईपर्यंत त्याची आवक आणि मागणी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
देवगड हापूसची आवक सुमारे २० दिवसांपूर्वी बंद झाली, तर रत्नागिरी हापूसची आवक आठ दिवसांपूर्वी थांबली आहे. त्यामुळे बाजारात कर्नाटकी हापूसच प्रमुख पर्याय ठरला आहे. पावसाअभावी त्याची गुणवत्ता टिकून राहिल्याने प्रतिडझन ४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.
-इक्बाल बागवान, अडत व्यापारी, बाजार समिती, सोलापूर
अन्य आंब्यांचे प्रतिकिलो दरलालबाग ३५
बेमिशा ३०
तोतापुरी ३०