ALSO READ: रिक्षात फिरण्याची यांची औकात नव्हती; आता "चार्टर्ड विमाने...संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली
मिळालेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धन मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. तसेच ही मोहीम रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ५६ समुद्रकिनाऱ्यावर राबवण्यात आली, या हंगामात १ लाख ८ हजारांहून अधिक कासवांच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले आहे. यामध्ये वन विभाग, कासव मित्र, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभाग होता व यांच्या प्रयत्नाने ही मोहीम यशस्वी झाली. ही मोहीम गेल्या २२ वर्षांहून अधिक काळ चालू आहे आणि दरवर्षी हजारो पिल्लांना नवजीवन मिळते.
ALSO READ: सावंतवाडीत विहिरीत १५ पिल्लांसह अडकलेल्या ८ फुटी महाकाय मगरीला जीवदान; वन विभागाची थरारक रेस्क्यू मोहीम
माहितीनुसार ऑलिव्ह रिडले कासवांची प्रजाती आहे. अंडी घालण्यासाठी ते कोकणाच्या किनाऱ्यावर येतात, कुत्री, पक्षी, पूर आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे पिल्लांचे जीवित नुकसान होते. त्यामुळे कृत्रिम घरट्यांमध्ये अंडी संरक्षित करून उबवण आणि पिल्ले सोडणे हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. हे कोकणातील पर्यावरण संरक्षणासाठी ही एक उत्तम उदाहरण आहे. तसेच या चालू हंगामात कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील ५६ समुद्रकिनाऱ्यांवरून तब्बल १ लाख ८ हजार ५९६ कासवांच्या पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले आहे. वनविभागाचा एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजननासाठी अजूनही अत्यंत अनुकूल आहे, हे या हंगामात सिद्ध झाले आहे.
ALSO READ: योग्य शिक्षण नाही, रोजगार नाही; आता कॉकरोच व्यवस्थेला उत्तर देतील अभिजित दिपके यांची गर्जना
Edited By- Dhanashri Naik