IND vs AFG : टीम इंडिया 400 पार, दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
GH News June 17, 2026 09:13 PM

कर्णधार शुबमन गिल आणि इशान किशन या दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिनस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 400 पार मजल मारली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानसमोर 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 402 धावा केल्या. भारतीय संघाने यासह मोठ्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8 वेळा 400 पेक्षा अधिक धावा करण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली. त्यामुळे आता टीम इंडिया 403 धावांचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तानला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.