Indian Railways: विना तिकीट रात्रीच्यावेळी प्रवास… TTE रेल्वेतून उतरवू शकतो का?
Tv9 Marathi June 17, 2026 09:46 PM

Indian Railways Tickets : भारतीय रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणतात. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. भारतीय रेल्वेच्या देशभरात हजारो ट्रेन रोज धावतात. देशात हजारो रेल्वे स्टेशन आहे. येथूनच प्रवाशांना रेल्वेचा प्रवास करणे सोपे जाते. रेल्वे प्रवासासाठी तिकिटासंबंधीचे नियम आहेत. भारतीय रेल्वेतून प्रवास करणारे अनेक फुकटे प्रवासी पकडल्या जातात. त्यासाठी वेळोवेळी रेल्वे प्रशासन मोहीम राबवते आणि अशा फुकट्या प्रवाशांकडून वसूली सुद्धा करण्यात येते. दंडही लावला जातो. पण रात्रीच्या वेळेस एखादा प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळला, तर त्याला तिकीट तपासणीस रेल्वेतून उतरवून देऊ शकतो का?

काय सांगतो नियम?

या नियमांचा उद्देश प्रवास अधिक सुविधाजनक करणे हा आहे. अनेकदा वेळेअभावी आणि झटपट इच्छित स्थळ गाठण्यासाठी अनेकदा रात्रीच्यावेळीस अथवा इतर कारणामुळे, पैसे नसल्याने, तिकीट काढण्याची इच्छा नसल्याने काही जण ट्रेनमध्ये विना तिकीट चढतात. अशावेळी विना तिकीट प्रवास केला म्हणून तिकीट तपासणीस त्यांना रात्रीच्यावेळी रेल्वेतून उतरवून देऊ शकतो का? याविषयीचे नियम काय आहेत? विना तिकीट ट्रेनमधून प्रवास केल्यास रेल्वे नियमांचे उल्लंघन आहे. पण थेट काही गुन्हा नाही. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, विना तिकीट यात्रा करणे चुकीचे आहे. त्यासाठी दंडाची तरतूद आहे. टीटीई अशा प्रवासात प्रवाशांकडून नियमानुसार, दंडाची वसूली करू शकतो.

रात्री-अपरात्री कोणत्याही स्टेशनवर उतरवू शकतो?

जर रेल्वेचा विना तिकीट प्रवास करताना प्रवाशी आढळला तर छोट्या, असुरक्षित आणि एकदम निर्मनुष्य रेल्वे स्थानकावर अशा प्रवाशाला उतरवले जात नाही. रेल्वेच्या नियमात हे स्पष्ट करण्यात आले आहे की प्रवाशाची सुरक्षा ही अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे विना तिकीट प्रवाशी आढळला तर त्याला टीटीई दंड आकारून पुढील सुरक्षित रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करण्याची मुभा देतो.

अर्थात जर विना तिकीट प्रवास करणारा प्रवासी टीटीईसोबत गैरवर्तन करत असेल, गोंधळ घालत असेल अथवा इतर प्रवाशांना इजा होईल असे वर्तन करत असेल तर कारवाई होऊ शकते. टीटीई रेल्वे सुरक्षा दल, RPF च्या जवानांकडे अशा प्रवाशाला सोपवू शकतो. असा प्रवाशाविरोधात कायदेशीर कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे नेहमी प्रवास करताना तिकीट सोबत असू द्या. विना तिकीट प्रवास करू नका. पण मोठ्या कारणामुळे विना तिकीट प्रवास करावा लागल्यासतिकीट तपासनीस आल्यास त्याच्याकडून तिकीट तयार करून घ्या. त्यामुळे तुमचा प्रवास सुरक्षित होईल आणि कोणताही अडथळा येणार नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.