AKSHAY KUMAR SHARES FUNNY BEHIND THE SCENES STORY FROM TEES MAAR KHAN: बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माती आणि कोरिओग्राफर फराह खान हिने तिच्या करिअरमध्ये १०० पेक्षा जास्त गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलय. दरम्यान अशातच अक्षय कुमारने फराह खानच्या रागीट स्वभावाचा एक मोठा किस्सा शेअर केलाय. तो म्हणाला की, 'फराहला सेटवर इतका राग येतो की, ती काय बोलते हेच तिला कळत नाही. इतकंच काय तर तीस मार खानच्या शुटिंगदरम्यान ती कतरिनावर प्रचंड चिडली. इतकी की, थेट कतरिनावर गोळी झाडण्यासाठी बंदूक शोधत होती.' असं अक्षय म्हणाला.
नुकतीच नेटफ्लिक्स इंडियाच्या युट्यूब चॅनलला फराह, प्रियदर्शन आणि अक्षय मुलाखत दिली. या मुलाखतीत सुरुवातीला प्रियदर्शन यांना तुम्हाला सेटवर कधी राग येतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, 'मला राग येत नाही, मला सेटवर अजिबात गोंधळ आवडत नाही' असं सांगितलं. दरम्यान याचवेळी अक्षय कुमार सहभागी होत फराहबद्दल बोलला.
तो म्हणाला की, 'फराहला सेटवर खूप राग येतो.' तेवढ्यात फराह त्याची फिरकी घेत विचारते की, 'तू वाईट शब्द वापरणार होतास ना?' त्यावर अक्षय म्हणतो की, 'नाही मला हे सांगायचं की, तू रागाच्या भरात स्वत: काय बोलतेस याचं भान तुला सुद्धा राहत नाही' यावर फराह अक्षेप घेते आणि म्हणते, 'मी काय बोलते हे मला माहित असतं.'
View this post on InstagramA post shared by Zoom TV (@zoomtv)
त्यावर अक्षय कतरिनासोबत मजेशीर किस्सा सांगत म्हणतो की, 'एकदा तू कतरिनावर खूप चिडली होती. इतकी की, थेट तू 'माझी बंदूक कुठे आहे?'असं म्हणत होती. खरंतर तिच्याकडे बंदूक नव्हतीच. परंतु तरी तिला कतरिनाला गोळी झाडायची होती.' अक्षयने हा किस्सा सांगितल्यावर सगळे हसू लागले.
'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल