18 जून 2026 पंचांग! गुरुपुष्यामृत योगासह वैनायकी गणेश चतुर्थीचा शुभ दिवस
esakal June 18, 2026 10:45 AM

*!!श्री मयूरेश्वर प्रसन्न!!*

☀️ धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

☀️ सूर्योदय – ०६:०१

☀️ सूर्यास्त – १९:०७

चंद्रोदय – ०९:१३

⭐ प्रात: संध्या – ०४:४९ ते ०६:०१

⭐ सायं संध्या – १९:०७ ते २०:१९

⭐ अपराण्हकाळ – १३:५२ ते १६:२९

⭐ प्रदोषकाळ – १९:०७ ते २१:१७

⭐ निशीथ काळ – ००:१२ ते ००:५५

⭐ राहु काळ – १४:१२ ते १५:५०

⭐ यमघंट काळ – ०६:०१ ते ०७:३९

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त– १२:३४ ते १४:१२

अमृत मुहूर्त– १४:१२ ते १५:५०

विजय मुहूर्त— १४:४५ ते १५:३७

⏳ कार्यसिद्धी वेळा – ११:१५ ते १३:५२ | १६:२९ ते २२:०१

⚠️ कार्यनाशक वेळा – ०६:५३ ते ११:१५ | १३:५२ ते १६:२९ | २२:०१ ते २४:००

मुंबई बंदर भरती/ओहोटी – भरती: ०९:१६ ते १५:५७ | ओहोटी: १५:५७ ते २२:३३ | भरती: २२:३३ ते २८:२४ | ओहोटी: २८:२४ ते ३४:१८

ग्रहमुखात आहुती – बुध (शुभ)

अग्निवास – पाताळी २३:४३ पर्यंत नंतर पृथ्वीवर

️ शिववास – २३:४३ पर्यंत क्रीडेत असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे त्यानंतर कैलासावर असल्यामुळे काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे

शालिवाहन शक १९४८

संवत्सर पराभव

अयन – उत्तरायण

ऋतु – ग्रीष्म

मास – ज्येष्ठ

पक्ष - शुक्ल पक्ष

तिथी – चतुर्थी (२३:४३ नं.) पंचमी

वार – गुरुवार

नक्षत्र – पुष्य (१५:४२ नं.) आश्लेषा

योग – व्याघात (२१:३७ नं.) हर्षण

करण – वणीज (१२:३९ नं.) भद्रा

चंद्र रास – कर्क

सूर्य रास – मिथुन

गुरु रास – कर्क

दिनविशेष – भद्रा १२.३९ ते २३.४३, ज्येष्ठी वैनायकी गणेश चतुर्थी, उमाव्रत, उमापूजन, गुरुपुष्यामृतयोग सूर्योदय ते १५.४२, अमृतसिद्धियोग-सर्वार्थसिद्धियोग १५.४२ प., रवियोग १५.४२ प.

✅विशेषआपली जन्मकुंडली आणि त्यातील ग्रह यांचे अवलोकन करून आपले आयुष्य कसे असेल याचे भविष्यकथन ज्योतिषी करत असतात. पण काही वेळा असे निदर्शनास येते की पत्रिका उत्तम आहे, असे सांगूनही प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या जातकाला मात्र कठीण अनुभवांचा सामना करावा लागतो. याचे कारण, पत्रिकेत केवळ ग्रह उत्तम असून भागत नाही. ते ग्रह कोणत्या अवस्थेत आहेत, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

त्या अवस्था कोणत्या, त्यांचे कोणते परिणाम पत्रिकेवर दिसून येतात, हे अभ्यासकांना व प्रेक्षकांना समजावे, जेणेकरून पत्रिका पाहण्याची योग्य पद्धत कोणती असावी आणि त्यांना येणाऱ्या अनुभवांमागची कारणमीमांसा करणे सोपे जावे या हेतूने प्रस्तुत video घेऊन येत आहोत.

https://youtube.com/watch?v=mW6seEQKuYs&si=ksXJyL3SQadVIAXz

शुभाशुभ दिवस - सकाळी १२:३९ प. शुभ दिवस, २३:४३ नं. शुभ दिवस

श्राद्ध तिथी - चतुर्थी श्राद्ध

आजचे वस्त्र – पिवळे

स्नान विशेष – हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे.

उपासना – बृहस्पती कवच स्तोत्राचे पठण करावे आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा.

दान – सत्पात्री व्यक्तीस हळद, साखर, पिवळे धान्य, पिवळे वस्त्र, लवण, सुवर्ण दान करावे

तिथीनुसार वर्ज्य – क्षौर, मुळा

दिशाशूल उपाय – दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा करण्यापूर्वी दहि भक्षण करून बाहेर पडावे.

चंद्रबळ – वृषभ , मिथुन , कर्क , कन्या , तुळ , वृश्चिक , मकर , कुंभ , मीन — या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.