Pune Nashik Railway: रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! उरळीवरून जाणार पुणे-नाशिक लोहमार्ग; ताशी १६० किलोमीटर वेग, नेमका कसा असेल मार्ग..
esakal June 18, 2026 11:45 AM

पुणे: ‘जीएमआरटी’ला (जायंट मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण) बाधा निर्माण होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने आता तिसऱ्यांदा पुणे-नाशिक लोहमार्ग बदलला आहे. हा प्रकल्प उरळी, वाघोलीमार्गे अहिल्यानगरहून नाशिकला जोडला जाणार आहे. तीन टप्प्यांत हे काम होणार असून, यासाठी सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. पुणे-नाशिक लोहमार्ग हा दुहेरी असून त्यावरून रेल्वे ताशी १६० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असणार आहे.

Deool Band 2: ‘देऊळ बंद-२’ ची कमाई आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी; प्रवीण तरडे-कैलास वाणी, साईबाबांच्या शिर्डीत संकल्प जाहीर

पुणे-नाशिक लोहमार्ग सुरुवातीला जीएमआरटी जवळून जाणार होता. त्याला विरोध झाल्याने या मार्गात बदल करून ‘जीएमआरटी’पासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर मार्ग प्रस्तावित केला. त्यानंतर पुन्हा मार्गात बदल करण्याचा निर्णय झाला. पुणे-अहिल्यानगर रस्त्याच्या बाजूनेच लोहमार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तसा मार्ग करणे शक्य नसल्याने आता उरळी, वाघोलीमार्गे नवीन मार्ग असणार आहे.

जीएमआरटी जवळून हा मार्ग जाणार नाही. पुणे-नाशिकदरम्यान नवीन लोहमार्ग निश्चित झाला आहे. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. यामुळे पुणे-नाशिकदरम्यान रेल्वे प्रवास वेगाने होणार आहे.

- अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री

Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या वर्षी अमेरिकेतून कमर्शियल पायलट बनण्याचा मान, सिद्धी हाडवळेची प्रेरणादायी यशोगाथा.. असा आहे मार्ग

पुणे ते उरळी (सध्या अस्तित्वात)

उरळी ते वाघोली (नवीन मार्ग)

वाघोली ते अहिल्यानगर (नवीन मार्ग)

अहिल्यानगर ते पुणतांबा (नवीन मार्ग)

पुणतांबा ते शिर्डी (सध्याचा मार्ग)

शिर्डी ते नाशिक (नवीन मार्ग)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.