बंगळूरू, कर्नाटक : विधान परिषदेच्या ७ जागांसाठी आज निवडणुका होत आहेत. विधान सौध येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. आमदारांना गुप्त मतदान करता यावे यासाठी दोन मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदान कक्षाच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज संध्याकाळीच निकालही जाहीर केला जाणार आहे.
यवतमाळ : वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख हे शिंदेसेनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या चिंचोली येथील निवासस्थानाबाहेर शुकशुकाट असून पोलिसांचा बंदोबस्त आहे.
Sangli-Satara Legislative Council elections : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवातसांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरवात झालीये. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. भाजपाकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप मैदानात आहेत. तर किशोर धुमाळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. सांगली-सातारा एकूण ८९५ इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून ४२३ इतकी मतदार संख्या सांगली जिल्ह्यातील आहे.
Whale vomit seized : खेडमध्ये व्हेलची १० किलो उलटी जप्त; दोन संशयितांना घेतले ताब्यातरत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर खेड रेल्वे स्थानकाजवळ दापोली सीमा शुल्क विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. कारवाईत ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलट्या) विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. यामध्ये तब्बल १० किलोपेक्षा जास्त वजनाचे अंबरग्रीस जप्त करून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई १६ जूनच्या पहाटे केली.
Maharashtra News : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान; मतमोजणी २२ जूनला होणारमुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या ११ जागांसाठी आज (गुरुवारी) मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक होत असून, त्यातील सहा जागांवर याआधीच महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. मतदानासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली असून, सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना मतदान करता येणार आहे. मतमोजणी २२ जूनला सकाळी होणार आहे.
Nagpur Legislative Council Voting : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदानLatest Marathi Live Updates 18 June 2026 : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. भाजपकडून डॉ. राजीव पोतदार, तर काँग्रेसकडून अतुल लोंढे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत ८३६ मतदार असून यामध्ये ४१९ पुरुष तर ४१७ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २२ तारखेला मतमोजणी होणार आहे. याशिवाय देश-राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, वाहतूक कोंडी, राजकीय हालचाली, क्रीडा, मनोरंजन आणि मान्सूनविषयक अपडेट्स यांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.