IND vs AFG ODI: भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात दुसरा वनडे सामना लखनौला बुधवारी झाला. या सामन्यात भारतीय संघाने १७० धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Videoया सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने सलामीवीर यशस्वी जैस्वालची विकेट ४ धावांवरच गमावली. त्यानंतर रोहित शर्मा ४८ धावांवर बाद झाला. पण कर्णधार शुभमन गिल आणि ईशान किशन या दोघांनीही शतके साजरी करताना २२४ धावांची भागीदारी केली. दरम्यान, ईशान ७९ चेंडूत १२५ धावा करून बाद झाला.
त्यामुळे श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण त्याला २६ धावाच करता आल्या. त्याला नांगेयालिया खरोटीने इब्राहिम झाद्रानच्या हातून झेलबाद केले. शुभमन गिलने ११० चेंडूत १५४ धावा केल्या. नंतर भारताचा डाव ४९.५ षटकात ४०२ धावांवर संपला.
श्रेयसचा मोठा विक्रममात्र, असे असले तरी श्रेयसने खास विक्रम केला आहे. या २६ धावांच्या खेळीदरम्यान त्याने वनडे क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या. त्याने ७२ डावात ३००० वनडे धावा केल्या आहेत. त्यामुळे तो सर्वात कमी डावात ३००० धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय खेळाडू ठरला आहे.
त्याने शिखर धवनची बरोबरी केली आहे, तर विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले आहे. शिखर धवननेही (Shikhar Dhawan) ७२ डावात वनडेत ३००० धावा पूर्ण केल्या होत्या, तर विराट कोहलीने ७५ डावात वनडेत ३००० धावा केल्या होत्या.
भारतासाठी सर्वात कमी डावात ३००० धावा(Fastest 3000 ODI Runs for India)
६२ डाव - शुभमन गिल
७२ डाव - शिखर धवन
७२ डाव - श्रेयस अय्यर
७५ डाव - विराट कोहली
७८ डाव - केएल राहुल
७९ डाव - नवज्योत सिंग सिद्धू
याशिवाय श्रेयस अय्यरने ३०४९ चेंडू खेळताना ३००० वनडे धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो सर्वात कमी चेंडूत भारतासाठी ३००० वनडे धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याच्यापुढे कपिल देव (२९९५ चेंडू), शुभमन गिल (३०१६ चेंडू) आहेत. श्रेयसने विरेंद्र सेहवागला मागे टाकले आहे. सेहवागने ३१६४ चेंडूत ३००० धावा केल्या होत्या.
IND vs AFG: अफगाणिस्तानला गिल-ईशानने चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; भारताचा दुसऱ्या वनडेत दणदणीत विजय, मालिकाही खिशात भारताचा विजयभारताने दिलेल्या ४०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला ४४.३ षटकात सर्वबाद २३२ धावाच करता आल्या. अफगाणिस्तानकडून रेहमत शाहने ७९ धावा करत एकाकी झुंज दिली. तसेच रेमनु्ल्लाह गुरबाजने ४१ धावांचे योगदान दिले. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही.
भारताकडून अर्शदीप सिंग आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर प्रिन्स यादवने २ विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.