Shubman Gill : शुबमन गिल याला आता पछाडणं अवघड! पाहा आकडेवारी
Tv9 Marathi June 19, 2026 07:45 AM

टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका अंतिम टप्प्यात आहे. टीम इंडियाने एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिजमधील 3 पैकी 2 सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. तर उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना हा शनिवारी 20 जून रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. भारताकडे हा सामना जिंकून पाहुण्या संघाला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानचा आतापर्यंत जे जमलं नाही ते करुन दाखवण्यावाचा प्रयत्न असणार आहे. अफगाणिस्तानला आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध एकही आंतरराष्ट्रीय सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचा भारत दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे.

कॅप्टन शुबमन गिलचा झंझावात

भारताला सलग 2 सामने जिंकून देण्यात कर्णधार शुबमन गिल याचं प्रमुख योगदान राहिलं आहे. शुबनने पहिल्या सामन्यात 84 धावा केल्या. तर प्रिन्सने दुसऱ्या सामन्यात दीडशतकी खेळी केली आहे. शुबमन यासह या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे शुबमन मॅन ऑफ सीरिजचा प्रबळ दावेदार आहे. पहिल्या 2 सामन्यांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

शुबमन गिल याच्या किती धावा?

शुबमनने या मालिकेत आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये 238 धावा केल्या आहेत. तर शुबमननंतर या यादीत दुसऱ्या स्थानी भारताचा फलंदाज इशान किशन आहे. शुबमन आणि ईशान या दोघांमध्ये 79 धावांचा फरक आहे. इशानने अफगाणिस्तान विरुद्ध 2 सामन्यांत 79.50 च्या सरासरीने 179 धावा केल्या आहेत. इशानने या खेळीत 1 शतक लगावलं आहे.

अफगाणिस्तानकडून सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?

तर अफगाणिस्तानचा रहमानुल्लाह गुरुबाझ हा या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा एकूण तिसरा आणि अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज आहे.  रहमानुल्लाह भारत-पाकिस्तान एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. गुरुबाझने 2 सामन्यांत 71.50 च्या सरासरीने एकूण 143 धावा केल्या आहेत.

तसेच शुबमन या मालिकेत 200 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. शुबमनला दुसऱ्या सामन्यात केलेल्या दीडशतकी खेळीचा मोठा फायदा झाला. त्यामुळे शुबमन गिल हाच मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार ठरणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.