सोन्याची खरेदी आता करावी की नंतर? दर वाढणार की कमी होणार? सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी
Marathi June 19, 2026 09:25 PM

सोन्याच्या दरात वाढ: दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य सोने खरेदीदारांच्या खिशावर होत आहे. अशातच आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार, येत्या काही महिन्यांत सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं भविष्यात सोन्याची खरेदी करणं खिशाला झळ देणारे ठरु शकते.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत किंचित चढ-उतार दिसून येत आहे

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत (Gold Price) किंचित चढ-उतार दिसून येत आहे. एका अहवालांनुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढणार आहेत. या अहवालानुसार, 2026 च्या चौथ्या तिमाहीपर्यंत सोन्याच्या किमती प्रति औंस सुमारे 6000 डॉलर्सपर्यंत वाढू शकतात. इतकेच नाही, तर 2027 च्या अखेरीस सोन्याच्या किमती प्रति औंस 6300 डॉलर्सपर्यंत वाढू शकतात. सोन्याच्या सध्याच्या किमती आणि त्यांची पातळी पाहता, येत्या काही महिन्यांत त्यात अंदाजे 40 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब सर्वसामान्यांसाठी, विशेषतः भारतीयांसाठी थोडी चिंताजनक ठरू शकते. प्रत्येक सणाला सोन्याची खरेदी केली जाते. भाववाढीमुळे खरेदीत किंचित घट होऊ शकते.

महागाई वाढली, पण सोन्याच्या किमती नाही

फेब्रुवारीपासून, जेव्हा इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाले, तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था अस्थिर आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबरोबरच लोकांना महागाईचा फटका बसला आहे. या महागाईचा सोन्याच्या किमतींवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला आहे. सोन्याचे दर कमी जास्त होत असल्याचे दिसून येत आहे.

Gold Silver Price Today: जळगाव बाजारातील आजची मोठी घसरण

सुवर्णनगरी जळगावच्या बाजारात आज सोन्या आणि चांदीच्या भावात मोठी घसरण (Decline) पाहायला मिळाली. जळगावच्या बाजारात काल सोन्याचे दर 148,500 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. त्यात आज एकाच दिवसात तब्बल 4,000 रुपयांची मोठी घसरण होऊन ते 144,500 रुपयांवर खाली आले आहेत. चांदीच्या किमतीत तर आज मोठा भूकंप झाला आहे. काल 250,000 रुपये प्रति किलो ग्रॅम असलेला चांदीचा दर आज तब्बल 18,000 रुपयांनी घसरला असून तो 238,000 रुपयांवर खाली आला आहे. भारतीय सराफा बाजारासोबतच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही (MCX) मौल्यवान धातूंच्या किमती कमालीच्या घसरल्या आहेत. जळगावच्या स्थानिक बाजारात तर सोन्या-चांदीच्या किमतीत थेट हजारो रुपयांचा फरक पडल्याने ग्राहकांची पावले पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे वळू लागली आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.