बापाच्या प्रतिमेला जोडे मार आणि पिंडदान कर मगच आम्ही.. सुषमा अंधारे यांचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या मुलाला आव्हान, थेट..
Tv9 Marathi June 20, 2026 01:45 PM

शिवसेना ठाकरे गटात मोठी फुट पडली. तब्बल 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली. खासदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेना नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे चांगलीच आक्रमक भूमिका घेत आहेत. सतत गंभीर आरोप केली जात आहेत. खासदार नागेश आष्टीकर पाटील यांनीही शिवसेना ठाकरे गटाकडून फारकत घेतली. हिंगोली जिल्ह्यात नागेश पाटील आष्टीकर यांचे वर्चस्व आहे. शिवसेनेला मोठे खिंडार हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात पडले. हिंगोली-परभणीचे विधान परिषेदे उमेदवार शिवसेनेकडून नागेश आष्टीकर पाटील यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर हे आहेत. नागेश पाटील आष्टीकर शिवसेना शिदे गटात दाखल झाल्यानंतर कृष्णा आष्टीकर यांनी दावा केला की, मी उद्धव ठाकरे यांच्याचसोबत आहे. यादरम्यान सुषमा अंधारे यांच्यावरही त्यांनी टीका केली.

सुषमा अंधारे यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही, मी शिवसेना ठाकरे गटासोबत प्रामाणिक असून मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे. माझे वडील शिवसेना शिंदे गटात जात आहेत, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. मी त्यांच्या संपर्कात नसल्याचा दावा, कृष्णा आष्टीकर यांनी केला होता. यावर आता थेट सुषमा अंधारे यांनी कृष्णा आष्टीकर यांना म्हटले की, कृष्णा आष्टीकर यांनी आपली निष्ठा सिद्ध करून दाखवावी.

उद्धव ठाकरेंसोबतची निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांनी स्वत:चाच वडिलांचे पिंडदान करावे. उद्याच त्यांनी पिंडदान करून बापाच्या प्रतिमेला जोडे मारावेत. मग आम्ही म्हणून की तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत खरोखरच आहात. तुम्ही कोणाला शहाणपण शिकवत आहात.. बाप तसा बेटा, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले. सुषमा अंधारे यांनी कृष्णा आष्टीकर यांना थेट मोठे आव्हान दिले.

हेच नाही तर वडील नागेश पाटील आष्टीकर जिवंत असताना थेट पिंडदान करण्यास सांगितले. आता यावर कृष्णा आष्टीकर नक्की काय बोलतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सुषमा अंधारे गेल्या काही दिवसांपासून नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सतत टीका करताना दिसत आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी नक्की काय घडले हे देखील सुषमा अंधारे यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.