Gadhvache Lagna Part 2: मराठी सिनेमसृष्टीत 'गाढवाचं लग्न'या (Gadhvache Lagna) सिनेमाचा (Entertainment) वेगळा फॅन क्लब आहे. या सिनेमातील पात्र प्रचंड गाजली. या कॉमेडी ड्रामा (Comedy Film) सिनेमात मकरंद अनासपूरे आणि राजश्री लांडगे या दोघांनी महत्त्वाची भूमिका साकारली. या सिनेमातील डायलॉग आणि सीन्स आजही तितकेच प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटातील गाणीही तितकीच फेमस आहेत. राजू फूलकर दिग्दर्शित हा सिनेमा आजही प्रेक्षकवर्ग आवर्जून पाहतात. 2007 साली रिलीज झालेल्या या सिनेमात हास्याची मेजवानी पाहायला मिळते. या सिनेमात 'गंगी' हे पात्र साकारणारी राजश्री लांडगे आपल्याला ठाऊकच असेल. पण या सिनेमानंतर अभिनेत्री फारशा प्रोजेक्ट्समध्ये दिसले नाही. अभिनेत्री नेमकं गेली कुठे? 'गाढवाचं लग्न' पार्ट 2 येणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकवर्गाकडून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, 'गाढवाचं लग्न' पार्ट 2बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
राजश्री लांडगे या अभिनेत्रीनं सिनेसृष्टी सोडली आहे का? सध्या हा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय. या प्रश्नावर अभिनेत्रीनं Filmy Marathi KMWला मुलाखत दिली. अभिनेत्री म्हणाली, ''गाढवाचं लग्न' पार्ट 2वर आम्ही काम करतोय. अजून अधिकृत घोषणा झालेली नाहीये. कधी येईल हे ही आम्हाला माहित नाही. पण त्या प्रोजेक्टरवर आमचं काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे', असं अभिनेत्री म्हणाली. 'तोपर्यंत मी माझ्या काही सामाजिक आणि शाळेसंबंधित कामं आहेत, ती पूर्ण करेन. कारण वडिलांनंतर आता या कामांची जबाबदारी माझ्यावर आहे. या कामांमुळे मी अर्धा वेळ मुंबईत आणि अर्धा वेळ गावी असते', असं अभिनेत्रीनं स्पष्ट केलं.
'कलाक्षेत्रात मी पहिल्यापासून कार्यरत होते आणि राहेन. पण मला नेमकं ठाऊक नाही, काहीतरी करत असताना, कुणीतरी पाय खेचत असतं. मी सिनेसृष्टी सोडली आहे, अशा अफवा पसरवल्या गेल्या. काही वर्ष यातच गेले. मला लोकांना स्पष्टीकरण देत बसावं लागलं की, मी सिनेसृष्टी सोडलेली नाही. खरंतर मी या क्षेत्रातील नसल्यामुळे मला ही कोंडी फोडायला थोडं जड गेलं. प्रत्येक व्यक्तीला वन टू वन कसं हाताळायचं, मीडियाला कसं हाताशी घ्यायचं, पार्ट्यांमध्ये कसं जायचं? या गोष्टी मला कधी कळल्याच नाही'.
'आता जेव्हा या गोष्टी कळल्या, तर मला या गोष्टी करण्याची गरज वाटत नाही. माझ्यावर महाराष्ट्रातील जनतेचं निस्वार्थ प्रेम आहे. त्यामुळे ती एक जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मी काहीही करायला लागली आहे, असं माझ्या प्रेक्षकांना वाटलं नाही पाहिजे, हे माझं मत आहे', असं अभिनेत्रीनं एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. अभिनेत्री सध्या सिनेइंडस्ट्रीत सक्रीय नसली तरी, गावाकडचे सामाजिक कार्य ती करत आहे. अभिनेत्री पुन्हा सिनेसृष्टीत कधी परतणार? या प्रश्नावर आता अभिनेत्रीच उत्तर देऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या: