PM Kisan Yojana: आनंदवार्ता, बळीराजाच्या खात्यात आज जमा होणार 23 वा हप्ता! 31 कोटी 44 लाख लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात
Tv9 Marathi June 20, 2026 01:45 PM

PM Kisan 23rd Installment will Credited Today: शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 23 वा हप्ता आज जमा होणार आहे. देशातील बळीराजांच्या खात्यात आज 31 कोटी 44 लाख रुपये जमा होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पश्चिम बंगालमधील हुगळी (तारकेश्वर) येथे आयोजित किसान सन्मान समारोह संमेलनातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण (DBT) पद्धतीने ही रक्कम जमा करतील. संध्याकाळी 4 वाजता पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

पीएम किसान योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 6,000 रुपये जमा होतात. दर चार महिन्यांनी तीन हप्त्यात ही रक्कम जमा होते. या योजनेचा 22 वा हप्ता मार्च 2026 मध्ये करण्यात आला होता. तर आज 23 वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही हे एकदा तपासून घ्या. नसेल तर तात्काळ ई-केवायसी आणि संबंधित प्रक्रिया तातडीने पूर्ण करा. ही सर्व प्रक्रिया डिजिटल, ऑनलाईन माध्यमातून पूर्ण करता येते.

ई-केवायसी अशी करा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता जमा होण्याअगोदर तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते तपासा. ही प्रक्रिया सोपी आहे. pmkisan.gov.in या साईटवर गेल्यास तुम्हाला यादीत नाव आहे की नाही हे तपासता येईल. या साईटवर शेतकरी कॉर्नर हा पर्याया देण्यात आला आहे. त्यात लाभार्थ्यांची यादी तपासा. याठिकाणी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, खाते क्रमांक टाका. त्यानंतर “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्सवर क्लिक केल्यास संपूर्ण माहिती समोर येईल.

ई-केवायसी पूर्ण केली असेल तर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा जमा होतील. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तर एग्रीस्टॅक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे ही सरकारने अत्यावश्यक केलेले आहे. ही प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर सन्मान निधी बँक खात्यात जमा होईल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांना 1800-115-5525 या हेल्पलाईन क्रमांक वर संपर्क कराता येईल. या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.

तर सन्मान निधी विसरून जा

बोगस लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी ई-केवायसी आणि इतर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. जे शेतकरी ई-केवायसी(e-KYC) आणि भू-सत्यापन (Land Verification) सारखी प्रक्रिया दरवेळी पूर्ण करत नाही. त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम जमा होत नाही. तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, केवायसी अपूर्ण असेल तर पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेचा 23 वा हप्ता जमा होणार नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.